69th Filmfare Awards Nomination: अ‍ॅनिमलवर भारी पडणार सनीपाजी? 'फिल्मफेयर' नॉमिनेशनची घोषणा, यंदा मध्ये कुणी मारली बाजी?

List of Filmfare Awards Nominees: बॉलीवूडमध्ये ज्या पुरस्काराची सेलिब्रेटी, अभिनेते वाट पाहत असतात त्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा फिल्मफेयर पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.
Filmfare Awards Nomination 2024
Filmfare Awards Nomination 2024 esakal

Filmfare Awards Nominations : बॉलीवूडमध्ये ज्या पुरस्काराची सेलिब्रेटी, अभिनेते वाट पाहत असतात त्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा फिल्मफेयर पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षीचा फिल्मफेयर हा अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. त्याचे दुसरे कारण म्हणजे गेल्या वर्षी विविध विषयांवरील चित्रपट प्रदर्शित झाले असून त्याला मिळालेला प्रतिसादही मोठा असल्याचे दिसून आले.

69th Filmfare Awards Nomination 2024 in Marathi

यंदाचा फिल्मफेयर पुरस्कार हा ६९ वा असणार आहे. २०२३ मध्ये जे काही ब्लॉकबस्टर चित्रपट होते त्यांचा समावेश या पुरस्काराच्या नॉमिनेशनमध्ये करण्यात आला आहे. गेलं वर्ष हे शाहरुख खान, सलमान खान, रणबीर कपूर, बॉबी देओल आणि सनी देओल यांच्यासाठी चांगलचं लाभदायी ठरले होते. त्यांच्या कलाकृतींना मोठ्या प्रमाणात यश मिळाल्याचे दिसून आले. चाहत्यांनीही त्या कलाकृतींना दाद दिली होती. बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करण्याचा मान यावेळी किंग खानच्या नावावर आहे. (Salman khan )

शाहरुखच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास त्याच्या जवान अन् डंकीला नॉमिनेशन मिळाल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर रणबीर कपूरच्या अॅनिमल आणि विक्रांत मेस्सीच्या १२ वी फेल ला देखील वेगवेगळ्या कॅटगिरीतून नॉमिनेशन मिळाले आहे. आता आपण कोणाला कोणत्या कॅटगिरीतून नॉमिनेशन मिळाले आहे. याविषयी सविस्तर माहिती घेऊयात...

बेस्ट फिल्म...(Best Film nominations)

१२ वी फेल, अॅनिमल, जवान, ओह माय गॉड २, पठाण, रॉकी और रानी की प्रेम कहानी...

बेस्ट डायरेक्टर...(Best direction)

अमित राय (ओएमजी २), अॅटली (जवान), संदीप रेड्डी वांगा (अॅनिमल), सिद्धार्थ आनंद (पठाण), विधु विनोद चोप्रा (१२ वी फेल)

बेस्ट फिल्म क्रिटिक्स ...(Best Film Critics)

१२ वी फेल, भीड (अनुभव सिन्हा), फराज (हंसल मेहता), जोराम (देवाशिष मखीजा), सॅम बहादूर (मेघना गुलजार), थ्री ऑफ अस (अविनाश अरुण धावरे), झिग्वाटो (नंदिता दास)

बेस्ट अॅक्टर मेल लिड...(Best Actor Male Lead)

रणबीर कपूर (अॅनिमल), रणवीर सिंह (रॉकी और रानी की प्रेम कहानी), शाहरुख खान (डंकी), शाहरुख खान (जवान), सनी देओल (गदर २), विकी कौशल (सॅम बहादूर),

बेस्ट अॅक्टर क्रिटीक्स..(Best Actor Critcs)

अभिषेक बच्चन (घुमर), जयदीप अहलावत (थ्री ऑफ अस), मनोज वाजपेयी(जोराम), पंकज त्रिपाठी (ओएमजी २), राजकुमार राव (भीड), विकी कौशल (सॅम बहादूर), विक्रांत मेस्सी (१२ वी फेल)

बेस्ट अॅक्ट्रेस एन ए लिडींग रोल...(Best Actress in leading role)

आलिया भट्ट (रॉकी और रानी की प्रेम कहानी), भूमी पेडणेकर (थँक्यू फॉर कमिंग), दीपिका पदुकोन (पठाण), कियारा अडवाणी (सत्यप्रेम की कथा), राणी मुखर्जी (मिसेज चॅटर्जी नॉर्वे), तापसी पन्नु (डंकी)

बेस्ट अॅक्ट्रेस क्रिटिक्स..(Best Actress Critics)

दीप्ती नवल (गोल्डफिश), फातिमा सना शेख (धक धक), रानी मुखर्जी (मिसेज चॅटर्जी नॉर्वे), सयामी खैर (घूमर), शहाना गोस्वामी (झिग्वाटो), शेफाली शहा (थ्री ऑफ अस)

बेस्ट डायलॉग...(Best Dialogue)

अब्बास टायरवाला (पठाण), अमित राय (ओएमजी२), इशिता मोईत्रा (रॉकी और रानी की प्रेम कहानी), सुमित अरोडा (जवान), वरुण ग्रोव्हर आणि शोएब जुल्फी नजीर (थ्री ऑफ अस), विधु विनोद चोप्रा (१२ वी फेल)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com