Anurag Kashyap: जेव्हा मुलीला बलात्काराची धमकी अनुराग घाबरला... नैराश्यात... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anurag Kashyap daughter

Anurag Kashyap: जेव्हा मुलीला बलात्काराची धमकी अनुराग घाबरला... नैराश्यात...

अनुराग कश्यप याची गणना टॉप दिग्दर्शकांच्या यादीत केली जाते. त्यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचं दिग्दर्शन केले आहे. नुकतच त्याने मराठी मनोरंजन विश्वावर केलेल्या वक्तव्यामूळे चर्चेत आलायं. मात्र तोच नाही तर त्यांची मुलगी आलिया कश्यप देखील तितक्याच चर्चेत असते. पण प्रसिद्धीच्या झोतात त्याचं आयुष्यही सोपं नव्हतं. खुद्द अनुराग कश्यपने खुलासा केला होता की, एक वेळ तो डिप्रेशनशी झुंज देत होता.

आज जरी अनुराग कश्यपची गणना इंडस्ट्रीतील नामांकित व्यक्तींमध्ये होत असली तरी एक काळ असा होता जेव्हा हे चकचकीत जग त्याच्यासाठी इतकं सोपं नव्हतं. एक-दोन नव्हे तर तब्बल तीन वर्ष त्याचं आयुष्यात नैराश्यात होतं .

हेही वाचा: Aamir Khan: दोनदा लग्न दोनदा घटस्फोट आता तिसरीची तयारी...

इतकंच नाही तर अनुराग कश्यपने त्याची मुलगी आलिया कश्यपबद्दलही असे काही खुलासे केले आहेत. ज्यांच्याबद्दल जाणून घेतल्यास तुम्हालाही एकदा आश्चर्य वाटेल. दिग्दर्शकाने सांगितले की, एक वेळ अशी होती जेव्हा त्यांची मुलगी आलियाला बलात्काराची धमकी दिली जात होती.

हे ही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

हे प्रकरण त्यावेळचं आहे जेव्हा तो जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात गेला होता आणि CAA विरोधी आंदोलनात भाग घेतला होता. यावेळी त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातही आवाज उठवला. इंडियन एक्स्प्रेसच्या दाव्यानूसार तो म्हणाला होता की, माझ्या मुलीला ट्रोल केलं जात असल्यानं मी त्यावेळी ट्विटरही बंद केले होते. तिला बलात्काराची धमकी दिली जात होती आणि याच कारणामुळे आलियाला झटके येऊ लागले होते.

हेही वाचा: Urfi Javed: उर्फिच्या अडचणी वाढणार... फॅशनचा अविष्कार करणं भोवलं...

आपल्या मुलीबद्दल बोलताना तो म्हणाला होता की, "मला एक छान मुलगी आहे. तिला प्रत्येक गोष्टीवर मोकळेपणाने बोलायला आवडते. पण तिची चिंता मला असते. जेव्हा परिस्थिती खराब होऊ लागली आणि तिला धमक्या मिळू लागल्या, तेव्हा तिची चिंताही वाढली."