esakal | कुंभमेळा म्हणजे कोरोनाचा बॉम्ब; दिग्दर्शक राम गोपाल वर्मांची पोस्ट

बोलून बातमी शोधा

filmmaker ram gopal varma got angry seeing huge crowd devotees kumbha mela
कुंभमेळा म्हणजे कोरोनाचा बॉम्ब; दिग्दर्शक राम गोपाल वर्मांची पोस्ट
sakal_logo
By
युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - कोरोनाची दुसरी लाट सर्वांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रशासनान प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनानं केलं आहे. त्यात कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातल्या शाही स्नानाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसत आहे. ज्याठिकाणी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे तिथे कोरोनाच्या गाईडलाईन्सच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे दिसून आले आहे. बॉलीवूडमध्येही कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. अनेक सेलिब्रेटींना कोरोनाचा फटका बसला आहे. सध्याच्या कुंभमेळ्याविषयी प्रसिध्द दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या व्टिटव्दारे परखड शब्दांत टीका केली आहे.

सोशल मीडियावर सक्रिय असणारे सेलिब्रेटी म्हणून राम गोपाल वर्मा यांचे नाव घ्यावे लागेल. आपल्या स्पष्ट प्रतिक्रियेसाठीही ते प्रसिध्द आहेत. सामाजिक - राजकीय मुद्द्यांवर स्पष्टपणे बोलण्यास ते कचरत नाहीत. व्टिटरच्या माध्यमातून सडेतोड प्रतिक्रिया देत सर्वांचे लक्ष वेधून घेण्याची किमया वर्मा यांना साधली आहे. त्यांनी सध्या आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन दोन फोटो शेअर केले आहेत. त्यातील एक फोटो हरिव्दारच्या कुंभमेळ्याचा आहे. तर दुसरा फोटो हा गेल्या वर्षी दिल्लीतील मस्जिदमध्ये जमा झालेल्यांचा आहे. त्यावरुन त्यांनी टिप्पणी केली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये राम गोपाल वर्मा यांनी म्हटले आहे, मार्च 2020 मध्ये दिल्लीतील मशिदीत जी गर्दी होती ती आजच्या कुंभमेळ्याच्या गर्दी पेक्षा छोटी फिल्म आहे. आता सर्व हिंदूना मुस्लिम बांधवांची माफी मागायला हवी. ( त्यावेळी त्यांना कोरोनाबद्दलची माहिती नव्हती) आताच्या परिस्थितीबद्दल आपल्या सर्वांनाच कल्पना आहे.

राम गोपाल वर्मा यांनी आपल्या पुढच्या व्टिटमध्ये महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन यांच्या एका विधानाचा संदर्भही दिला आहे. आता कुंभमेळा 2021 आणि त्यावेळी जमात 2020 या मुर्खतेचं कारण केवळ देवालाच माहिती आहे. राम गोपाल वर्मा यांचं हे व्टि्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एवढं बोलून राम गोपाल वर्मा थांबलेले नाहीत. त्यांनी आपल्या तिस-या व्टिटमध्येही काही गोष्टींबाबत सध्याच्या घडामोंडींवर कमेंट केली आहे. त्यांनी लिहिलं आहे, आता तुम्ही जे पाहता आहात तो कुंभ मेळा नाही. हा कोरोनाचा अॅटम बॉम्ब आहे. मला आश्चर्य वाटते की यासगळ्याला कोण जबाबदार आहे? राम गोपाल वर्मा यांच्या या तिन्ही व्टिटवर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.