

Shiv Kumar Khurana passes away: बॉलिवूडमधील ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक शिव कुमार खुराना यांचे निधन झाले आहे. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईमधील ब्रह्मकुमारी ग्लोबल रुग्णालयात उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.
शिव कुमार खुराना यांनी तब्बल 35 वर्ष चित्रपटसृष्टीत काम केले. अशोक कुमार, संजीव कुमार, फिरोज खान, शेख मुखतियार, हेलन, जॉय मुखर्जी, विनोद मेहरा, जरीना वहाब, कमाल सदना ते कादर खान, सदाशिव अमरापूरकर, रझा मुराद आणि अनुपम खेर अशा अनेक दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी काम केले आहे.
अभिनेते विनोद खन्ना यांना सर्वप्रथम नायकाची भूमिका साकारण्याची संधी शिव कुमार खुराना यांनी आपल्या चित्रपटात दिली होती. सुनील दत्त यांच्या होम प्रोडक्शनद्वारे निर्मित 'मन का मीत' या चित्रपटातून विनोद खन्ना यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात खन्ना यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. त्यानंतर विनोद खन्ना यांना केवळ खलनायकाच्या भूमिकेसाठीच विचारले जायचे. पण विनोद खन्ना यांना शिव कुमार खुराना यांनी हीरो म्हणून जगासमोर आणले. 1971 मध्ये रिलीज झालेला 'हम तुम और वो' हा तो चित्रपट होय. एवढेच नव्हे तर विंदू दारा सिंह यांनाही खुराना यांनीच मनोरंजनविश्वात आणले.
मिट्टी और सोना, 'फर्स्ट लव लेटर', 'बदनाम', 'बदनसीब', 'बे आबरू', 'सोने की जंजीर' आणि 'इंतकाम की आग' या चित्रपटांचे दिग्दर्शन शिव कुमार खुराना यांनी केले होते. तर 'हम तुम और वो', 'दगाबाज' आणि 'अंग से अंग लगाले' या चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली होती. शिव कुमार खुराना यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.