'सूर्यवंशी' आणि '83' चित्रपट मोठ्या पडद्यावर येणार प्रेक्षकांच्या भेटीला

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 30 जून 2020

हॉटस्टारने लक्ष्मी बॉम्ब, भुज, सडक 2, द बिग बुल आदी सात  चित्रपटांच्या डिजिटल रिलीजची अधिकृत घोषणा केली असून अशा प्रकारे डिजिटल रीलीजचा शुभारंभ अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराना यांच्या गुलाबो सिताबोने काही आठवड्यांपूर्वी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर केला.

मुंबई ः  सध्या थिएटर्स बंद असल्याने अनेक चित्रपट निर्माते त्यांच्या चित्रपटांच्या डिजिटल रिलीजची घोषणा करत आहेत. कालच हॉटस्टारने लक्ष्मी बॉम्ब, भुज, सडक 2, द बिग बुल आदी सात  चित्रपटांच्या डिजिटल रिलीजची अधिकृत घोषणा केली असून अशा प्रकारे डिजिटल रीलीजचा शुभारंभ अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराना यांच्या गुलाबो सिताबोने काही आठवड्यांपूर्वी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर केला. पण असे असूनही काही चित्रपट चाहत्यांच्या प्रेमाखातर मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहेत.

मनोरंजन विश्वाचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

 सूर्यवंशी आणि 83 या वर्षाच्या अखेरपर्यंत मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहेत. लॉकडाउन जाहीर होण्याच्या काही दिवस अगोदर, 24 मार्च  रोजी सूर्यवंशी मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता.  तर 83 हा चित्रपट 10 एप्रिल 2020 रोजी रिलीज होणार होता.
मात्र  व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटर पेजवर त्यांच्या या ट्विटमध्ये "बिग डेव्हलपमेन्ट ... #सूर्यवंशी आणि #83Film प्रथम थिएटरमध्ये रिलीज करण्याची योजना आहे." असे लिहीत सूर्यवंशी दिवाळीत रिलीज होण्याची शक्यता असून यावर्षी 83 नाताळमध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे जाहीर केले.

वेब सीरिज बघताय जरा सावध व्हा, नाहीतर तर होऊ शकतं हे...

दरम्यान, "सूर्यवंशी" चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी यांनी केले असून या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिका साकारत आहे तर कतरिना कैफही अक्षयसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
 तर दुसरीकडे, कबीर खानच्या 1983 वर्ल्डकपवर आधारित "83" या चित्रपटात रणवीर सिंगने क्रिकेटर कपिल देव यांची भूमिका साकारली असून त्यांनी 1983 च्या विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The films 'Suryavanshi' and '83' will be released on the big screen

टॉपिकस
Topic Tags: