'फिरंगी' बनणार गुगल मॅपचा साथी 

वृत्तसंस्था
शनिवार, 3 नोव्हेंबर 2018

नवी दिल्ली : अमिताभ बच्चन आणि आमीर खान यांच्या बहुचर्चित 'ठग ऑफ हिंदुस्तान'चे प्रोमो पाहून त्यांच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे. यात आमीर खान 'फिरंगी'च्या भूमिकेत असून, गाढवावर स्वार झालेला दिसणार आहे. त्याच्या या वेगळ्या पात्राचा वापर 'गुगल मॅप' करणार असून, आमीरचा फिरंगी मल्लाह नागरिकांना मार्ग दाखविणार आहे. 

'ठग ऑफ हिंदुस्तान'च्या संचाने 'गुगल मॅप'बरोबर एक अभिनव योजना आखली आहे. ही योजना गुरुवारपासून (ता.1) अमलात आली आहे. यामध्ये प्रवासी आपल्या अँड्रॉईड किंवा "आयएसओ' स्मार्टफोनवर फिरंगीच्या मदतीने गाडी चालविण्याचा पर्याय निवडू शकतील. आमीर खानचा हा फिरंगी आपल्या पाळलेल्या गाढवावर बसून मार्गदर्शन करणार आहे. 

"ठग ऑफ हिंदुस्तान'ची मेजवानी दिवाळीत मिळणार आहे. या बहुचर्चित चित्रपटाबरोबर आम्ही भारतात प्रथमच सहकार्य करीत आहोत. सर्वांच्या स्मार्टफोनवर हा वेगळा अनुभव देण्यास आम्ही उत्सुक आहोत.'' 
- नेहा वाईकर, उत्पादन व्यवस्थापक, गुगल मॅप 

Web Title: 'Firangi' will become Google Maps Partner