Kiss Day: बाप रे! चार मिनिटांचा किसिंग सीन, बॉलीवूडच्या त्या चित्रपटानं केलं होतं थक्क

Kiss Day: बाप रे! चार मिनिटांचा किसिंग सीन, बॉलीवूडच्या त्या चित्रपटानं केलं होतं थक्क

भारतीय चित्रपटसृष्टीत एक काळ असाही होता जेव्हा दोन पक्षी किंवा फुलांच्या माध्यमातून पडद्यावर रोमँटिक किंवा इंटिमेट सीन दाखवले जायचे. हा स्वातंत्र्यपूर्व काळ होता, जेव्हा किस किंवा बोल्ड सीन उघडपणे चित्रित करण्याचा विचारही केला जात नव्हता. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, त्यावेळी भारतीय सिनेमा इतका बोल्ड नव्हता. पण याच काळात एका अभिनेत्री आणि अभिनेत्याने अतिशय बोल्ड किसिंग सीन केले. हा किसिंग सीन भारतीय सिनेमातील पहिला सर्वात मोठा किसिंग सीन (Indian cinema first ever longest kiss) मानला जातो.

Devika Rani-Himanshu Rai
Devika Rani-Himanshu Rai

हा किसिंग सीन देविका राणी (Devika Rani) आणि हिमांशू राय (Himanshu Rai) यांच्यात 1933 मध्ये आलेल्या 'कर्मा' (Karma) चित्रपटात शूट करण्यात आला होता, जो 4 मिनिटांचा होता. भारतीय चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटात एवढा लांब किसिंग सीन दाखविण्यात आला होता. त्यावेळी यावरून बराच गदारोळ झाला होता. माहितीनुसार, देविका आणि हिमांशूवर चित्रित करण्यात आलेला किसिंग सीन हा उत्कट लिप-लॉक नव्हता. वास्तविक, दृश्यानुसार, चित्रपटात हिमांशू रायच्या पात्राला साप चावला आहे. त्यानंतर तो कोलमडून पडतो. देविकाचे पात्र तिला पुन्हा शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करते. यादरम्यान ती त्याला लिप किस करते.

Devika Rani-Himanshu Rai
Devika Rani-Himanshu Rai

देविका राणी 1930 आणि 1940 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. ती भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली नायिका मानली जात होती. 10 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक यशस्वी चित्रपट केले आणि ठळक व्यक्तिरेखा साकारल्या. देविका राणीचा जन्म एका श्रीमंत कुटुंबात झाला. जेव्हा ती 9 वर्षांची होती, तेव्हा ती शिकण्यासाठी इंग्लंडला गेली. पण जेव्हा तिने चित्रपटांमध्ये प्रवेश केला तेव्हा ती तिच्या बोल्ड शैलीमुळे चर्चेत आली. 1928 मध्ये देविका हिमांशू राय यांना भेटली आणि त्याच वर्षी त्यांचे लग्न झाले. हिमांशू राय हे चित्रपट निर्मातेही होते. 1929 मध्ये जेव्हा ते 'अ थ्रो ऑफ डाइस' नावाचा चित्रपट बनवत होते, तेव्हा देविका एक कॉस्च्युम डिझायनर आणि कला दिग्दर्शक म्हणून काम करायची. देविकाने 'कर्मा' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. इंग्रजी भाषेतील अशा प्रकारचा हा पहिलाच चित्रपट मानला जातो, जो एका भारतीयाने बनवला होता. नंतर हा चित्रपट हिंदी भाषेत 'नागन की रागिनी' (Naagan Ki Ragini) म्हणून बनवला गेला, पण हा चित्रपट चालला नाही.

Devika Rani-Himanshu Rai
Devika Rani-Himanshu Rai

एकंदरीत चित्रपटांमध्ये किसींग सीनचा ट्रेंड गेल्या अनेक दशकांपासून पाहायला मिळत आहे. मात्र, असे अनेक कलाकार आहेत जे ऑनस्क्रीन किस करणे टाळतात. असाच एक अभिनेता म्हणजे सलमान खान (Salman Khan). जेव्हा सूरज बडजात्या, 'मैंने प्यार किया' (Maine Pyar Kiya) या चित्रपटातून सलमानला हिरो म्हणून लॉन्च करत होते, तेव्हा या चित्रपटात त्याच्या आणि भाग्यश्रीमध्ये (Bhagyashree) एक किसिंग सीन होता. सलमान आणि भाग्यश्रीचा हा पहिलाच चित्रपट होता आणि दोघांनीही हा सीन करण्यास नकार दिला होता. त्यानंतर सूरज बडजात्याने मध्यभागी आरसा लावून सलमान आणि भाग्यश्री यांच्यातील किसींग सीन चित्रित केले.

Salman Khan-Bhagyashree
Salman Khan-Bhagyashree

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com