Laal Singh Chaddha : 'सत् श्री अकालजी, मायसेल्फ लालसिंग चढ्ढा!'

टीम ईसकाळ
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

आमीरने 'Laal Singh Chaddha'चे पोस्टर ट्विटरवर शेअर केले आहे. हे पोस्टर बघून आमीरच्या चाहत्यांची उत्सुकता पुन्हा एकदा ताणली गेली आहे.

मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या 'लाल सिंग चढ्ढा'ची सध्या जोरदार हवा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने एक प्रोमो शेअर केला होता. यावरून त्याचे फर्स्ट पोस्टर कधी रिलीज होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर आज आमीरने 'Laal Singh Chaddha'चे पोस्टर ट्विटरवर शेअर केले आहे. हे पोस्टर बघून आमीरच्या चाहत्यांची उत्सुकता पुन्हा एकदा ताणली गेली आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

आज शेअर केलेल्या पोस्टरमध्ये एका पंजाबी तरूणाच्या वेशात आमीर दिसतोय. आमीर 'लाल सिंग चढ्ढा'ची भूमिका साकारतोय. मोठी दाढी, डोक्यावर पंजाबी पगडी, डोळ्यांत बोलके भाव, हातात बॉक्स अशा लूकमध्ये लाल सिंग चढ्ढा बसला आहे. या फोटोला 'सत् श्री अकालजी, मायसेल्फ लाल सिंग चढ्ढा' असे कॅप्शन दिलंय. आमीरच्या चेहऱ्यांवरील भाव इतके बोलके आहेत की, हा लाल सिंग चढ्ढा कसा असेल याची कल्पना येते. 

#LaalSinghChaddha मिस्टर परफेक्शनिस्ट पुन्हा येतोय! 'लाल सिंग चढ्ढा'ला घेऊन!

आमीरच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर 'लाल सिंग चढ्ढा' हे नाव वारंवार येत होते. काही दिवसांपूर्वी आमीरने 'लाल सिंग चढ्ढा' या चित्रपटाचे मोशन पोस्टर ट्विटरवर शेअर केले होते. आकाशी रंगाच्या या मोशन पोस्टरमध्ये एक पांढऱ्या रंगाचे पीस उडत आहे व 'आमीर खान - लाल सिंग चढ्ढाच्या भूमिकेत' असे लिहिले आहे. आमीरने या पोस्टरला 'क्या पता हम में है कहानी, या है कहानी में हम' असे कॅप्शन दिले होते. 2020 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल. तसेच या चित्रपटात आमीरसोबत करीना कपूर दिसेल अशी चर्चा आहे. अद्वैत चंदन या चित्रपटाचे दिग्दर्शन करेल.

Tanhaji : 'मैं आपको हारने नहीं दूंगी'; काजोल दिसणार मराठमोळ्या रूपात

आमीरने 'लाल सिंग चढ्ढा'च्या कथानकाबाबत किंवा त्याच्या भूमिकेबाबत आतापर्यंत काहीच उघड केले नाही, पण हॉलीवूड चित्रपट फॉरेस्ट गंप या चित्रपटावरून घेतला आहे, अशी चर्चा आहे. आमीरने या चित्रपटासाठी 20 किलो वजन कमी केले आहे. या आमीर एका तरूणाची भूमिका साकारतच असल्याने त्याला तसे दिसणे गरजेचे होते, त्यामुळे त्याने डाएटवर भर दिलाय. 

पोस्टर रिलीज झाल्यापासून #LaalSinghChaddha हा हॅशटॅग ट्रेंडिंग आहेत, अन् सोशल मीडियावर हा पोस्टर कौतुकाचा विषय ठरतोय. 

 

 

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first look of Aamir Khan s Laal Singh Chaddha released