Tanhaji Poster : 'स्वराज्य से बढकर क्या?'; तानाजी सज्ज!

टीम ईसकाळ
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

'गड आला पण सिंह गेला' अशी उपाधी ज्या तानाजी मालुसरेंसाठी वापरली गेली, त्या तानाजींच्या जीवनपटावर आधारित हा चित्रपट असेल. काजोलने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये भारदस्त रूपात, हातात तलवार घेऊन अजय तानाजींच्या भूमिकेत दिसतोय.

सध्या ऐतिहासिक चित्रपटांना सोन्याचे दिवस आले आहेत. अशातच बहुप्रतिक्षीत आणि बहुचटर्चित अशा 'तानाजी : द अनसंग वॉरियर' या चित्रपटाचा फर्स्ट लूक आज शेअर केलाय. अजय देवगण मागील अनेक दिवस या चित्रपटासाठी तयारी करतोय. त्यामुळे तानाजीच्या या पोस्टरला विशेष महत्त्व आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

'तानाजी' साकारत अजय देवगणची 'फिल्मी सेंच्युरी'!

अजयची पत्नी व अभिनेत्री काजोलने तानाजीचे पोस्टर शेअर केले. 'गड आला पण सिंह गेला' अशी उपाधी ज्या तानाजी मालुसरेंसाठी वापरली गेली, त्या तानाजींच्या जीवनपटावर आधारित हा चित्रपट असेल. काजोलने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये भारदस्त रूपात, हातात तलवार घेऊन अजय तानाजींच्या भूमिकेत दिसतोय. या पोस्टरवर 'स्वराज्य से बढकर क्या?' असे लिहिले आहे. पोस्टरवरून हा चित्रपट कसा असेल याची कल्पना येते.

मराठमोळा ओम राऊत हा या चित्रपटाचे दिग्दर्शन करतोय. तर उदयभानाच्या भूमिकेत सैफ अली खान दिसेल. तानाजींच्या पत्नीची भूमिका काजोलच साकारणार अशी चर्चा आहे. 10 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होईल. हा चित्रपट अजय देवगणचा 100 वा चित्रपट असल्याने त्याला एक वेगळे व विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. 

अक्षय कुमारचा 'बेल बॉटम'मधला हा हटके लूक बघितला का?

शिवाजी महाराजांच्या इतिहासात सिंहाचा वाटा असलेल्या या तानाजीचा इतिहास भव्य पडद्यावर बघणे सर्वांसाठीच औत्सुक्याचे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first look of hindi movie Tanhaji poster released