
मानुषीचा पहिलाच चित्रपट बॉलिवूडच्या खिलाडी कुमारसोबत असणार आहे. पहिलाच चित्रपट सुपरस्टारसोबत करणे म्हणजे नशीबच म्हणावं लागेल. अक्षय आणि मानुषी यांचा 'पृथ्वीराज' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मुंबई : भारतीय मॉडेल आणि 2017 मध्ये मिस वर्ल्ड ठरलेली सुंदरी मानुषी छिल्लर लवकरच बॉलिवूडमध्ये पदापर्ण करणार आहे. मानुषी दिसायला अतीशय सुंदर आहेच पण, आता ती अभिनय क्षेत्रात म्हणजेच मनोरंजन क्षेत्रात दिसणार आहे. मानुषीचा पहिलाच चित्रपट बॉलिवूडच्या खिलाडी कुमारसोबत असणार आहे. पहिलाच चित्रपट सुपरस्टारसोबत करणे म्हणजे नशीबच म्हणावं लागेल. अक्षय आणि मानुषी यांचा 'पृथ्वीराज' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अक्षय कुमार या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारीत आहे. मानुषी यामध्ये पृथ्वीराज यांची पत्नी म्हणजेच संयोगिता यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
संयोगिता यांच्या भूमिकेतला मानुषीचा लुक तिने इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. अंधारातील हा फोटो शेअर करत मानुषीने 'संयोगिता' असं कॅप्शन दिलं आहे. तिचा संपूर्ण लुक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात आणि अक्षय कुमारसोबत काम करण्याची संधी मिळाल्यामुळे मानुषीने निर्मात्यांतचे आभार मानले आहे. 'पृथ्वीराज' या सिनेमाची कथा राजा पृथ्वीराज यांच्या पराक्रमावर आधारीत आहे. राजा पृथ्वीराज आणि संयोगिता यांची प्रेमकथा अजरामर आहे पण, या सिनेमाच्या निमित्ताने ती मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. यावर्षी दिवाळीच्या मुहुर्तावर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सिनेमाचं दिग्दर्शन डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदी करणार आहेत. याआधी त्यांनी दूरदर्शनवरील अनेक मालिकांचा दिग्दर्शन केलं आहे. चाणक्य, पिंजर सिनेमा, मोहल्ला अस्सी यांचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. संयोगिताच्या रोलसाठी चंद्रप्रकाश हे अतीशय सुंदर भारतीय तरुणीच्या शोधात होते.
अनेक तरुणींचे ऑडिशन त्यांनी घेतले. अखेर संयोगीताच्या व्यक्तिमत्वाला साजेशी अशी तरुणीची गरज होती. आणि त्यासाठी मानुषी रोलसाठी योग्य वाटली आणि तिच्या पदरात हा सिनेमा पडला. मानुषीचंही या रोलसाठी अनेकदा ऑडिशन घेण्यात आलं. यशराज फिल्मची टीम मानुषीला गेले 9 महिने विशेष प्रशिक्षण देत आहेत.