दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार ‘हे’ पाच चित्रपट  

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 October 2019

सिनेमासूष्टीमध्ये  प्रत्येक सणानिमित्त चित्रपट प्रदर्शित करणे जणू काही परंपराच बनली आहे.

मुंबई : सिनेमासूष्टीमध्ये  प्रत्येक सणानिमित्त चित्रपट प्रदर्शित करणे जणू काही परंपराच बनली आहे. यंदाच्या दिवाळी निमित्त अनेक कलाकार आपल्या चित्रपट प्रदर्शनाच्या तयारीला लागले आहेत. यावेळी बॉलिवूड सिनेमाचं नाही तर मराठी चित्रपट देखील बॉक्सऑफिसवर धमाका करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे यंदाची दिवाळी प्रेक्षकांसाठी फुल ऑन एन्टरटेनिंग असणार आहे. 

दरवेळी दिवाळीत किंवा कोणत्याही मोठ्या सणाला मराठीच्या तुलनेत बॅालिवूडमधूनच मोठे चित्रपट रिलीज होतात. मात्र यंदाची दिवाळी याला अपवाद असणार आहे. यावेळी मराठी चित्रपटात सुपरस्टार अंकुश चौधरीचा ‘ट्रिपल सीट’ हा चित्रपट २5 ऑक्टोबर प्रदर्शित होणार आहे. ज्यात अंकुशसह शिवानी सुर्वे आणि पल्लवी पाटील या दोघी मुख्य भूमिकेत दिसतील. याआधी अंकुशचा डबल सीट हा चित्रपट 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला असून यावर्षीचा ट्रिपल सीट हा पूर्णपणे वेगळा असल्याचे दिग्दर्शकांनी सांगितले आहे. यासोबतच सोनाली कुलकर्णीची मुख्य भूमिका असलेला ‘हिरकणी’ हा चित्रपट २४ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

तर दुसरीकडे बॉलिवूडचा खिलाडी अशी ओळख असणा-या अक्षय कुमारचा मल्टीस्टारर चित्रपट हाउसफुल 4 या हाऊसफुल चित्रपट मालिकेच्या चौथ्या भागाची चाहते अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. हा चित्रपट देखील दिवाळीनिमित्त 25 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. यात रितेश देशमुख, बॉबी देओल, कुति सेनन, पूजा हेगडे तसेच कुति खरबंदा अश्या तगड्या स्टारकास्ट असणार आहे. तसेच नवरात्रीत सर्वत्र फेमस झालेल्या 'ओढणी ओढू तो' हे गाणे असणारा राजकुमार राव आणि मौनी रॅायचा ‘मेड इन चायना’हा चित्रपट देखील 25 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five films will be screened at the mouth of Diwali