Republic Day 2023: 'या' गाण्यांशिवाय आज तुमचा दिवस सुरू होणे अशक्यच!. जाणून घ्या सविस्तर..

आज प्रजासत्ताक दिनानिमित्त काही अजरामर गाण्यांविषयी..
Five patriotic songs in bollywood to play this January 26 and feel patriotism
Five patriotic songs in bollywood to play this January 26 and feel patriotismsakal

Republic Day 2023: आज भारताचा 74वा प्रजासत्ताक दिन. प्रत्येकजन देशाप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी सकाळी उठून भारतीय ध्वजाला वंदन करण्यासाठी घराबाहेर पडतो, पण ही वातावरण आपल्याला भावते आणि भारावून टाकते ते म्हणजे संगीतामुळे.

आपल्याकडच्या देशभक्तीपर गीतांमध्ये इतकी ताकद आहे की, ती गाणी ऐकताच आपल्याला स्फुरण चढते. आज तर ही काही गाणी ऐकल्याशिवाय आपला दिवसच सुरू होणे कठीण आहे. जाणून घेऊया या गीतांविषयी..

(Five patriotic songs in bollywood to play this January 26 and feel patriotism)

हेही वाचा : ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

ऐ मेरे वतन के लोगों – हे गाणं आजही आपल्या डोळ्यात पाणी आणतं. लता मंगेशकर यांच्या अजरामर स्वरांनी सजलेल्या या गाण्याला आधी लता दिदींनी वेळे अभावी नकार दिला होता, पण नंतर याच गाण्याने त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली. 1963 मधील भारत-चीन युद्धादरम्यान आपला जीव गमावणाऱ्या शहिद सैनिकांच्या स्मरणार्थ हे गाणं तयार केलं गेलं होतं.

मेरे देश की धरती - 1967 या वर्षी प्रदर्शित झालेल्या “उपकार’ या चित्रपटातील “मेरे देश की धरती, सोना उगले, उगले हिरे मोती, मेरे देश की धरती’ हे गाणे आजच्या दिवशी वाजतेच. अत्यंत सुरेख आणि समर्पक असे आपले देशाचे वर्णन गीतकार गुलशन बावरा यांनी केले आहे. कल्याणजी आनंदची यांनी या गीताला संगीतबद्ध केले होते तर महेंद्र कपूर यांचे स्वर होते. ही गाणे मनोज कुमार यांच्यावर हे चित्रीत करण्यात आले होते..

Five patriotic songs in bollywood to play this January 26 and feel patriotism
Suman Kalyanpur: नुकत्याच 'पद्मभूषण' ठरलेल्या सुमन कल्याणपूर कोण होत्या? त्यांच्याविषयी थोडक्यात..

भारत का रहने वाला हूं – हे गाणं 1970 मधील ''पूरब और पश्चिम'' सिनेमातील आहे. या सिनेमात अशोक कुमार, सायरा बानो, मनोज कुमार, प्राण, निरूपा रॉय, प्रेम चोपडा आणि विनोद खन्ना यांनी महत्त्वाच्या भूमिका स्विकारल्या होत्या. आजवरच्या गाजलेल्या देशभक्तीपर गीतांमध्ये या गाण्याचा आवर्जून उल्लेख केला जातो.

हर करम अपना करेंगे ऐ वतन तेरे लिए - 1986 सुभाष घई दिग्दर्शित “कर्मा’ चित्रपटात “हर करम अपना करेंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए’ हे गीत आहे. मोहम्मद अजीज आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजातील या गीताचे गीतकार आनंद बक्षी तर संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आहेत. दिलीप कुमार, नूतन, दारासिंग, मुक्री आदी कलावंतावर चित्रीत असलेले हे गाणे प्रत्येकाच्या मनात घर करून आहे.

संदशे आते है – 1997 साली रिलीज झालेल्या ''बॉर्डर'' सिनेमातील ''संदेशे आते है'' हे देशभक्तीपर गीत जुन्या आणि नव्या पिढीच्याही [प्रचंड जवळचे आहे. जे पी दत्ता दिग्दर्शित 'कर्मा' या चित्रपटासाठी जावेद अख्तर यांनी हे गाणं लिहिलं होतं तर अनु मलिक यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं होतं. रूपकुमार राठोड आणि सोनू निगम यांनी आपल्या आवाजाने या गाण्याला चार चाँद लावले. भारतीय सैनिकांचं दु:ख व्यक्त करण्यात करणारं हे गाणं सहज डोळ्यात पाणी देऊन जातं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com