किशोरदांच्या स्मृतीदिनानिमित्त 'फ्लॅशबॅक'...

संतोष धायबर santosh.dhaybar@esakal.com
शनिवार, 22 ऑक्टोबर 2016

किशोर कुमार यांचा जन्म मध्य प्रदेशातील खांडवा या गावी झाला. त्यांचे नाव आभास कुमार असे ठेवण्यात आले होते. त्यांचे वडील कुंजलाल गांगुली एक वकील होते. आई गौरीदेवी एका श्रीमंत घराण्यातील होत्या. त्यांना अशोक कुमार, सती देवी आणि अनुप कुमार अशी भावंडे होती. किशोर कुमार भावंडांमध्ये सर्वांत लहान होते.

हिंदी चित्रपटसृष्टीतील हजारो गाण्यांना आपल्या आवाजाने अजरामर करणारे किशोर कुमार म्हणजेच किशोरदांचा आज (गुरुवार) स्मृतीदिन. किशोर कुमार यांच्यावर नेटिझन्सनी मोठ्या प्रमाणावर ट्विट केल्यामुळे त्यांचे नाव ट्रेण्डमध्ये आले. अफलातून अदाकारीने एकेकाळी चित्रपटसृष्टीवर राज्य करणाऱया किशोरदांचा आवाज आजच्या तरूण पिढीलाही भावत असल्याचे ट्विटर ट्रेण्डमधून समोर आले. 

किशोर कुमार (जन्म 4 ऑगस्ट 1929 मृत्यू 13 ऑक्टोबर 1987) यांनी गायलेली गाणी आजही कोट्यवधींच्या हृदयावर अधिराज्य गाजवत आहेत. ते केवळ गायकच नव्हते तर अभिनेते, संगितकार, दिग्दर्शक, निर्माते व पटकथालेखक म्हणूनही प्रसिद्ध होते. हिंदी चित्रपटांबरोबरच त्यांनी बंगाली, मराठी, असामी, गुजराती, कन्नडा, भोजपुरी, मल्याळम, ओडिसा व उर्दुमध्ये गाणी गायली. चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना 8 वेळा फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आले. लता मंगेशकर पुरस्काराबरोबरच मध्यप्रदेश सरकारने पुरस्कार देऊन गौरविले. शिवाय, मध्यप्रदेश सरकारने त्यांच्याच नावाने ‘किशोर कुमार पुरस्कार‘ सुरू केला आहे.

किशोर कुमार यांचा जन्म मध्य प्रदेशातील खांडवा या गावी झाला. त्यांचे नाव आभास कुमार असे ठेवण्यात आले होते. त्यांचे वडील कुंजलाल गांगुली एक वकील होते. आई गौरीदेवी एका श्रीमंत घराण्यातील होत्या. त्यांना अशोक कुमार, सती देवी आणि अनुप कुमार अशी भावंडे होती. किशोर कुमार भावंडांमध्ये सर्वांत लहान होते.

हिंदी चित्रपटसृष्टीत अशोक कुमार यांचा जम बसल्यावर किशोर कुमार यांच्या चित्रपट कारकिर्दीला सुरवात झाली. बॉम्बे टॉकीजमध्ये ते समूह गायक म्हणून काम करीत होते. "शिकारी‘ या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा अभिनेता म्हणून काम केले. यात अशोक कुमार यांची प्रमुख भूमिका होती. "जिद्दी‘ या चित्रपटात त्यांना गाण्याची प्रथम संधी मिळाली. यानंतर त्यांना गाण्याच्या अनेक संधी मिळाल्या. त्यांनी अनेक गाण्यांना आपल्या आवाजाचा साज चढविला. रूप तेरा मस्ताना..., दिल एैसा किसे ने..., खैके पान बनारसवाला आदी गाण्यांना फिल्मफेअरचा पार्श्‍वगायनाचा पुरस्कार मिळाला. जिंदगी एक सफर..., ये जो मोहब्बत है..., चिंगारी कोई भडके... आदी गाणी फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आली होती. 

किशोर कुमार यांनी गायलेली व अजरामर झालेली निवडक गाणी पुढीलप्रमाणे-

 • दिल क्या करे जब किसी से (ज्युली)
 • पल पल दिल के पास (ब्लॅकमेल)
 • पांच रुपय्या बारा आणा (चलती का नाम गाडी)
 • मेरे भोले बलम (पडोसन)
 • हम तो मोहब्बत करेगा (दिल का थुग)
 • जरूरत है जरूरत है (मन-मौजी)
 • आके सिधी लगे दिल पे जैसे (हाल्फ तिकीट)
 • मेरे सपनो की राणी (आराधना)
 • छिल छिल छिल्ला के (हाल्फ तिकीट)
 • दे दे प्यार दे (शराबी)
 • मेरे सामनेवाली खिडकी मे (पडोसन)
 • एक लकडी भिगी भागी सी (चलती का नाम गाडी)
 • ओम शांती ओम (कर्ज)
 • बचना ये हसीनो लो मै आ गया (हम किसीसे कम नही)
 • खायके पान बनारस वाला (डॉन)
 • पग घुंगरू बांध के (नमक हलाल)
 • देखा ना है रे.. (बॉम्बे टू गोवा)
 • ईना मिना डिका (अशा)
 • मै हू झूम झून झुमरो (झुमरो)
Web Title: Flashback on Kishore Kumar's Birthday, by Santosh Dhaybar