
Maanvi Gagroo Wedding : 'फोर मोअर शॉट्स'च्या मानवीनं लग्न केलं, कुणालाच नाही कळलं!
Maanvi Gagroo Wedding : टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये ज्या मालिकेनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते त्या फोर मोर शॉट्स प्लीज सीरिजला मोठा प्रतिसाद मिळाला होता. आगळ्या वेगळ्या विषयाची मांडणी मालिकेमध्ये करण्यात आली होती. बोल्डनेस, द्विअर्थी संवाद आणि कथा यामुळे तरुणाईनं या मालिकेला पसंती दर्शवली होती.
फोर मोअर शॉट्स मधील एक प्रसिद्ध अभिनेत्री विवाहबंधनात अडकली आहे. तिचे नाव मानवी गागरु. तिनं तिच्या सोशल मीडियावरुन ही बातमी चाहत्यांसाठी शेयर केली आहे. चाहत्यांनी तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. गेल्या काही दिवसांपासून मानवीच्या लग्नाची चर्चा रंगली होती. आता तिचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत.
Also Read - ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
मानवीनं कॉमेडियन कुमार वरुण याच्याशी लग्न केले आहे. पण यासगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मानवीनं लग्न केलं पण कुणालाच माहिती नाही. तिनं गुपचूप लग्न केल्यानं चाहत्यांनी देखील आश्चर्य व्यक्त केले आहे. अभिनेत्रीनं इंस्टावर शेयर केलेल्या त्या फोटोंनी नेटकरी खूश झाले आहेत. फोर मोअर शॉट्समधून मानवी चर्चेत आली होती. आपल्या निवडक मित्र मंडळींच्या उपस्थितीत तिनं लग्न केलं आहे.

Four More Shots Please Maanvi Gagroo Kumar Varun
इंस्टावर फोटो शेयर करताना मानवीनं लिहिलं आहे की, आम्ही आमच्या मित्रांच्या उपस्थितीत विवाहबद्ध होतो आहोत याचा आम्हाला विशेष आनंद आहे. तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असू द्यात असेही मानवीनं म्हटले आहे. लग्नाच्यावेळी मानवीचा लूकही नेटकऱ्यांच्या कौतूकाचा विषय ठरताना दिसतो आहे.