
जाहिरातींमधून सुरू झाला प्रवास; आता 'महाराणी' बनून गाजवतेय OTT प्लॅटफॉर्म
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री हुमा कुरेशीची Huma Qureshi मुख्य भूमिका असलेली 'महाराणी' Maharani ही वेब सीरिज नुकतीच प्रदर्शित झाली. यामध्ये हुमासोबतच सोहम शाह,अमित सियाल हे कलाकर महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. या सीरिजमधील हुमाच्या दमदार अभिनयाची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. हुमाने तिच्या करिअरमधील सर्वांत चांगले काम या केले आहे, असे म्हटले जात आहे. (From advertisement to maharani web series interesting facts about huma qureshi)
महारानी वेब सीरिजमध्ये हुमाने एका अशिक्षित महिलेची भूमिका साकारली आहे, जी बिहारमधील राजकारणात प्रवेश करते आणि मुख्यमंत्री होते. हुमाने तिच्या करिअरची सुरुवात जाहिरातींमध्ये काम करून केली. तिने शाहरुख खान आणि आमिर खानसोबत जाहिरातींमध्ये काम केले आहे. हुमाचे जाहिरातींमधील काम दिग्दर्शक अनुराग कश्यपने पाहिले. अनुरागने त्याच्या 'गँग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटामध्ये हुमाला काम करण्याची संधी दिली. या चित्रपटामधील अभिनयामुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली.
हेही वाचा: ..म्हणून वडील मंत्री झाल्यानंतर सोनाक्षीने शाळा सोडण्याचा दिला इशारा
हुमा 2008 मध्ये मुंबईत आली. त्यानंतर तिने 'जंक्शन' या चित्रपटासाठी ऑडिशन दिले. पण या चित्रपटाचे शूटिंग झालेच नाही. हुमाने बिल्ला 2 या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटासाठी 700 मुलींनी ऑडिशन दिले होते. त्यामध्ये हुमाची निवड झाली होती.
हेही वाचा: विवाहबाह्य संबंध असल्याच्या आरोपांवर करणचं स्पष्टीकरण; म्हणाला..
Web Title: From Advertisement To Maharani Web Series Interesting Facts About Huma
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..