'एफटीआयआय'मध्येही होतेय लैंगिक शोषण

FTII metoo sexual harrasment nishtha jain esakal news
FTII metoo sexual harrasment nishtha jain esakal news

'गुलाबी गॅंग'च्या दिग्दर्शिका निष्ठा जैन यांनी टांगली फेसबुकवर लक्तरं

मुंबई : सध्या लैंगिक शोषणाबद्दल अनेक महिला आवाज उठवताना दिसू लागल्या आहेत. हाॅलिवूडपुरतं असलेलं हे लोण आता जगभर पसरतं आहे. #Metoo असं सांगत अनेकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. अशातच पुण्यातील नामांकीत अशा फिल्म अॅंड टेलिव्हिजन इंन्स्टिट्यूट आॅफ इंडियामधील शिक्षकांवरही काही आरोप झाले आहेत. एफटीआयआयने मात्र आपल्या शिक्षकांनाच पाठिंबा देत आपल्या शिक्षकांचं रेकाॅर्ड 'क्लीन' असल्याचं म्हटलं आहे. ही बाब समोर येते न येते तोच गुलाबी गॅंग या चित्रपटाच्या दिग्दर्शिका निष्ठा जैंन यांनी एफटीआयआयमध्ये चालणारा प्रकार फेसबुकवरून जाहीर केला आहे. त्यामुळे शिक्षणाच्या नावाखाली होणारं महिलांचं शोषण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. 

निष्ठा जैन यांची फेसबुक पोस्ट

निष्ठा यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर हा खुलासा केला आहे. अर्घ्य बसू असं या प्रोफेसरच नाव असून एफटीआयआयमध्ये ते शिकवायला होते. यांच्याबद्दल पोस्ट लिहिताना निष्ठा यांनी अर्घ्य यांची भेट कशी झाली, कोणत्या पार्टीमध्ये ते कसं वागले. त्यावेळी इतर कोण कोण हजर होते हे सगळं नावासकट त्या व्यक्तींना टॅग करून लिहिलं आहे. बसू यांनी जेव्हा आपलं लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना आपण कसं ढकललं इथपासून त्यांचा हात कसा आपल्या छातीवर होता इथवर्यंत सगळं लिहिलं आहे. हे सगळं लिहून बसू हे असे प्रोफेसर आहेत ज्यांचा मेंदू त्यांच्या कंबरेखाली आहे असंही म्हटलं आहे. निष्ठा यांच्या या हवाल्याने एफटीआयआयमध्ये चालणारे नवे उद्योग लोकांच्या नजरेत आले आहेत. 

काही दिवसांपूर्वी राया सरकार या लाॅ शिकणाऱ्या मुलीने 60 शिक्षकांची यादी जाहीर  केली आहे. यात एफटीआयआयमध्ये शिकणाऱ्या तीन शिक्षकांचीही नावं आहेत. निरंजन दत्ता (एक्स्टर्नल फॅकल्टी, एडिटिंग), संदीप चटर्जी (फॅकल्टी, डिरेक्शन) आणि अर्घ्य बसू (माजी प्रोफेसर) यांचा समावेश होतो. पण एफटीआयआयने मात्र या सर्व शिक्षकांची बाजू घेत, त्यांचं रेकाॅर्ड क्लीन असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर निष्ठा जैंन यांच्या खुलाश्याने एफटीआयआयमधला प्रकार पुन्हा चर्चेत आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com