Ameesha Patel: 'OTT प्लॅटफॉर्मवर फक्त LGBTQ कटेंट' अमिषाचं वक्तव्य चर्चेत

Ameesha Patel Slams Homosexual Content On Ott Platforms
Ameesha Patel Slams Homosexual Content On Ott Platforms Esakal

Gadar 2 Ameesha Patel: बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल तिच्या मोस्ट अवेटेड चित्रपट गदर 2 मुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ज्यामध्ये तारा सिंह आणि सकिना ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर थिरकताना दिसणार आहे. गदर २ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ती व्यस्त आहे. ती सतत मुलाखती देत ​​असते.

Ameesha Patel Slams Homosexual Content On Ott Platforms
Love Sex Aur Dhokha 2: पुन्हा होणार लव्ह, सेक्स आणि धोका पण यंदा असणार...! रिलिज डेट आली समोर..

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ओटीटी प्लॅटफॉर्मवर राग व्यक्त केला आहे. त्यात तिचे विधान सध्या खुप चर्चेत आले आहे. तिने ओटीटीच्या कटेंटबद्दल बोलताना सांगितले , आज मुले स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर शो आणि चित्रपट पाहू शकत नाहीत कारण तिथे फक्त 'समलैंगिकता'च दाखवण्यात येत आहे.

Ameesha Patel Slams Homosexual Content On Ott Platforms
Genelia Deshmukh Trial Period: बाप भाड्याने हवा! जिनीलीया शोधतेय तिच्या लेकासाठी 'ट्रायल पिरियड'वर पप्पा!

अमीषा म्हणते की या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर अडल्ट कंटेंट दाखवलं जात आहे. OTT वर भरपूर गे, लेस्बियन आणि समलैंगिक कंटेंट आहे आणि ती लहान मुलांसाठी योग्य नाही.

यावेळी अमिषा म्हणाली की, "लोक आता चांगल्या, योग्य सिनेमाची वाट पाहत आहेत. एकेकाळी तुम्ही नातवंडे आजी-आजोबांसोबत बसून सिनेमे पाहू शकत होतात, आता तो काळ संपला. OTT नक्कीच तुम्हाला ते देत नाही. ओटीटीवर समलैंगिकता, गे-लेस्बियन अशा प्रकारच्या सीरिजवर जास्त भर देण्यात येतो."

Ameesha Patel Slams Homosexual Content On Ott Platforms
Kshetrapal Shree Dev Vetoba: कोकणचा क्षेत्रपाल वेतोबा येतोय, हा अभिनेता साकारणार भुमिका

"अशी काही दृश्य दाखवली जातात की ज्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलांचे डोळे झाकावे लागतात किंवा तुमच्या टेलिव्हिजन आणि मोबाईलवर चाइल्ड लॉक लावावे लागते."

आजचे प्रेक्षक चित्रपटांमध्ये काय मिस करत आहेत असं अमिषा वाटत असं विचारण्यात आल्यावर ती म्हणाली की, पूर्वी लोक जास्त फिरत नसायचे त्यामुळे चित्रपट त्यांना ते दाखवायचं. पूर्वीच्या काळात संगीत इंडस्ट्री आजच्याइतका संपन्न नसला तरी जुणी गाणी आजही लोकांच्या मनात घर करून आहेत.

तिच्या चित्रपचाबद्दल बोलतांना ती म्हणाली की, "गदर 2 हा 'भावना, संगीत, संवाद आणि अॅक्शन' ने भरलेला आहे." अनिल शर्माचा गदर 2 हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणात प्रदर्शित होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com