Gadar 2 Ameesha Patel: 'नातेवाईक, मित्र 'गदर २' पाहायला तयार नाहीत, ते म्हणतात..., अमिषाचा मोठा खुलासा'

अमिषानं एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, माझे जवळचे मित्र आणि नातेवाईक हे गदर २ पाहायला तयार नाहीत.
Ameesha Patel reveals friends and family had written off Gadar 2
Ameesha Patel reveals friends and family had written off Gadar 2 esakal
Updated on

Ameesha Patel reveals friends and family had written off Gadar 2 : बॉलीवूडमध्ये सध्या सनी देओलचा गदर २ सुरु आहे. त्याला प्रेक्षकांचा, चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. अशातच गदर २ मधील प्रमुख अभिनेत्री अमिषानं केलेला खुलासा तिच्या चाहत्यांसाठी धक्कादायक आहे.

अमिषानं एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, माझे जवळचे मित्र आणि नातेवाईक हे गदर २ पाहायला तयार नाहीत. त्यांनी या चित्रपटाला बॉयकॉट केले आहे. तब्बल २२ वर्षांनी प्रदर्शित झालेल्या गदर २ ची सध्या मोठी क्रेझ आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं विक्रमी कमाई केली आहे. आतापर्यत गदर २ ने चारशे कोटींपेक्षा जास्त कमाई करुन एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

Also Read - दिल्लीतल्या केवळ प्रशासकीय बदल्यांपुरतंच मर्यादित नाही, दिल्ली सेवा विधेयक. काय आहेत

अनिल शर्मा दिग्दर्शित गदर २ मध्ये सनी देओल, अमिषा पटेल, उत्कर्ष शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २००० मध्ये गदरचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. त्यावेळी या चित्रपटानं प्रेक्षकांची तुफान लोकप्रियता मिळवली होती. त्यानंतर मोठ्या अंतरानं हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. केवळ भारतातच नाहीतर जगभरामध्ये गदर २ ने धुमाकूळ घातला आहे. वेगवेगळ्या देशांमध्ये गदर २ चे प्रमोशन सुरु झाले आहे.

अशातच अमिषानं जो खुलासा केला आहे त्याकडे नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. बॉलीवूडमधीलच काही लोकं अशी आहेत की त्यांना गदर २ च्या यशानं पोटदुखी झाली आहे. त्यांना गदर २ चे यश पाहवत नाही. अशी प्रतिक्रिया अमिषानं दिली आहे. एका मुलाखतीमध्ये अमिषानं म्हटले आहे की, माझ्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी गदर २ न पाहण्याची भूमिका घेतली आहे. ही लोकं मला जाणीवपूर्वक अपमानित करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांनी त्या चित्रपटाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Ameesha Patel reveals friends and family had written off Gadar 2
Gadar 2 Sunny Deol : लंडनच्या रस्त्यावर सनीची इंट्री, टाळ्या-शिट्टयांनी भारतीयांनी केलं स्वागत!

मी जेव्हा माझ्या नातेवाईकांना आणि मित्रांना तुम्ही गदर २ पाहिला की नाही असा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी मला सरळ नाही म्हणून उत्तर दिले. आम्ही तो चित्रपट पाहणार नाही.असेही सांगितले. तो चित्रपट जेव्हा ओटीटीवर येईल तेव्हा आम्ही पाहू. एवढे पैसे खर्च करुन तो पाहण्यात काय अर्थ आहे, असा प्रश्नही त्यांनी मला विचारला. यावर त्यांना काय बोलावे हेच मला कळेना. अशा शब्दांत अमिषानं तिची प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com