Gadar 2 VS OMG 2 Box Office Day 1: कोणी मारली बाजी! दोघांनी किती कोटींची केली कमाई?

गदर 2' आणि 'OMG 2' ने पहिल्या दिवशी किती कमाई केली त्यावर नजर टाकूया.
Gadar 2 Vs OMG 2
Gadar 2 Vs OMG 2 Esakal
Updated on

Gadar 2 VS OMG 2 Box Office Day 1: गेल्या काही दिवसांपासून दोन सुपरहिट बॉलिवूड कलाकारांचे दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज होते. त्यात पहिला सनी देओलचा 'गदर 2' आणि अक्षय कुमार स्टारर 'OMG 2'. हे दोन्ही सिनेमे पहिल्या भागाचे सिक्वेल होते.

दोघांचा फॅनबेसही चांगला आणि चित्रपटाच्या पहिल्या भागालाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे दुसऱ्या सिक्वेलमध्ये आता काय असणार याची उत्सूकता प्रेक्षकांना लागली होती. 2023 मधील दोन्ही सर्वाधिक प्रतिक्षेत असणारे हे चित्रपट काल 11 ऑगस्टला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाले.

आता सर्वांचे लक्ष चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. चित्रपटांच्या पहिल्या दिवसाबद्दल बोलायचं झालं तर, सनी देओल पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर त्यांची जादू दाखवण्यात यशस्वी झाला. सनीचा हातोडा अक्षयच्या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कमाईवर पडला आहे.

Gadar 2 Vs OMG 2
Sunny Deol Gadar 2 : तारा सिंगनं निराशा केली, चित्रपट पाहून डोकेदुखी वाढली! नेटकरी नाराज

अक्षय कुमारच्या 'OMG 2' ला समाधानकारक ओपनिंग मिळालेली नाही. अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठीच्या 'OMG 2'ला अॅडवान्स बुकिंगही कमी मिळाली तर 'गदर 2' ने यात बाजी मारली. तर 'गदर 2' हा शाहरुख खानच्या 'पठाण' नंतर 2023 मधल दुसरा सर्वात मोठी ओपनिंग करणारा चित्रपट ठरला. 'गदर 2' आणि 'OMG 2' ने पहिल्या दिवशी किती कमाई केली त्यावर नजर टाकूया.

Gadar 2 Vs OMG 2
Gadar 2 Reaction : राष्ट्रपती द्रौपद्री मुर्मूंना सनीचा 'गदर' पाहण्याची इच्छा! दिग्दर्शकांना सेन्सॉर बोर्डाकडून विनंती

'गदर 2' ची पहिल्या दिवसाची कमाई केली

SacNilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'गदर 2' ने पहिल्या दिवशी 40 कोटींची कमाई केली आहे. 10 ऑगस्टपर्यंत या चित्रपटाची दोन लाखांहून अधिक तिकिटे विकली गेली होती. अॅडवान्स बुकिंगमधूनच या चित्रपटाने 17.60 कोटींची कमाई केली आहे. 'गदर 2' देशभरातील 3500 हून अधिक स्क्रीन्सवर रिलीज करण्यात आला होता.

Gadar 2 Vs OMG 2
Rathi Karthigesu: सुप्रसिद्ध भरतनाट्यम डान्सर रथी कार्थिगेसु यांचं निधन, वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

'OMG 2' ची पहिल्या दिवसाची कमाई केली

अक्षय कुमारच्या 'OMG 2' बद्दल बोलायचे तर, हा देखील एक सिक्वेल चित्रपट आहे. रिलीजपूर्वीच खूप वादात सापडला होता. या चित्रपटाला 'ए' प्रमाणपत्र देण्यात आले आणि या चित्रपटात अक्षय शिवदूतच्या भूमिकेत दिसला आहे. SacNilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'OMG 2' ने रिलीजच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 9.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com