esakal | अमृता फडणवीस यांची 'गणेश वंदना'; पहा व्हिडीओ
sakal

बोलून बातमी शोधा

Amruta Fadnavis

अमृता फडणवीस यांची 'गणेश वंदना'; पहा व्हिडीओ

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अनोखी गायनशैली आणि राजकीय शेरेबाजीमुळे सतत चर्चेत असणाऱ्या अमृता फडणवीस Amruta Fadnavis यांचं नवीन गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. आगामी गणेशोत्सवानिमित्त अमृता यांचं हे खास गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'गणेश वंदना' Ganesh Vandana असं या व्हिडीओचं नाव आहे. गणपती बाप्पाच्या आगमनासाठी सर्वजण उत्सुक आहेत. याच पार्श्वभूमीवर अमृता यांचा हा व्हिडीओ प्रदर्शित झाला असून त्यांनी हे गाणं डॉक्टर्स आणि फ्रंटलाइन वर्कर्सना समर्पित केलं आहे.

कोरोना महामारीच्या काळात देशभरातल्या डॉक्टरांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली आणि कोट्यवधी लोकांचा जीव वाचवला. डॉक्टरांना परमेश्वराचं दुसरं रुप मानलं जातं. सण-उत्सव असतानाही ते रुग्णांच्या सेवेसाठी कायम सज्ज असतात. त्यांच्यासाठी अमृता फडणवीस यांनी हा व्हिडीओ समर्पित केला आहे. युट्यूबवर त्यांचं हे गाणं प्रदर्शित झालं असून अल्पावधीतच त्याला आठ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

हेही वाचा: शाहीर साबळेंच्या आयुष्यावर 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपट; केदार शिंदेंचं दिग्दर्शन

अमृता फडणवीस यांची आजवर अनेक गाणी प्रदर्शित झाली आहेत. महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबतही त्यांचा गाण्याचा अल्बम प्रदर्शित झाला होता. अमृता फडणवीस यांचं गायनावर विशेष प्रेम असून जमेल तितका वेळ त्या गायनासाठी देण्याचा प्रयत्न करतात.

loading image
go to top