esakal | मालिकांमध्ये गणेशोत्सवाचा जल्लोष; नव्या नात्यांचा श्रीगणेशा
sakal

बोलून बातमी शोधा

मालिकांमध्ये गणेशोत्सवाचा जल्लोष; नव्या नात्यांचा श्रीगणेशा

मालिकांमध्ये गणेशोत्सवाचा जल्लोष; नव्या नात्यांचा श्रीगणेशा

sakal_logo
By
स्वाती वेमूल

झी मराठी Zee Marathi वाहिनीने 'नव्या नात्यांच्या बांधू गाठी' असं म्हणत ऑगस्ट महिन्यात काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सादर केल्या. या सर्व मालिकांना प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाददेखील मिळत आहे. सध्या सगळीकडे श्रींच्या आगमनाची लगबग चालू आहे. त्यात झी मराठीदेखील यंदाचा गणेशोत्सव प्रेक्षकांसाठी खास बनवण्यासाठी विशेष सादरीकरण करणार आहे. ‘वेध भविष्याचा’ या कार्यक्रमात गणेशोत्सवानिमित्त वेगवेगळे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. आदेश बांदेकर, स्वप्नील जोशी, भाऊ कदम, निलेश साबळे, श्रेया बुगडे, अनिता दाते, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, उमेश जगताप हे कलाकार या कार्यक्रमात उपस्थित राहून गुरुजींसोबत गप्पा मारणार आहेत.

हे विशेष भाग १० सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येतील. तसेच होम मिनिस्टरसोबत लिटिल चॅम्प्स गणेशोत्सव साजरा करणार आहेत. आदेश भावोजी या विशेष भागात सारेगमप लिटिल चॅम्प्समधील स्पर्धकांच्या कुटुंबाला भेट देणार आहेत. महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’मध्ये नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली ‘माझी तुझी रेशीमगाठ’ची टीम सज्ज होणार आहे.

हेही वाचा: वकिली सोडून बाप्पासाठी बनवतेय खणाचे दागिने; पाहा व्हिडिओ

गणेशोत्सव विशेष भाग साजरा करण्यासाठी प्रार्थना बेहरे, श्रेयस तळपदे आणि मायरा वायकुळ तसंच या मालिकेतील कलाकार या मंचावर हजर होणार आहेत. ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत देखील गणरायाचं आगमन होणार आहे आणि गणरायाच्या आगमनासोबतच दिपू आणि इंद्रामध्ये मैत्रीच नातं खुलताना दिसेल. इकडे ‘येऊ कशी तशी मी नांदायला’मध्ये देखील गणपती बाप्पाच्या आगमनाने ओम आणि स्वीटूमधील दुरावा दूर होणार का हे देखील पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.

loading image
go to top