संजय लीला भन्साळी 'कोविड पॉझिटिव्ह' 

Gangubai Kathiawadi Director Sanjay Leela Bhansali Tests Positive For COVID 19
Gangubai Kathiawadi Director Sanjay Leela Bhansali Tests Positive For COVID 19

मुंबई -  प्रसिध्द दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा गंगुबाई काठियावाडी हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय आहे. तो पुढील काही दिवसांत प्रदर्शितही होणार आहे. मात्र या चित्रपटाच्या नावावरुन वादाला सुरुवात झाली आहे. कामाठीपुरा भागातील रहिवाशांनी ते नाव ठेऊ नये अशी भूमिका घेतली आहे. त्यासाठी त्यानं मनसेकडे निवेदनही दिले आहे. आता या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आणखी एक नवी समस्या उभी राहिली आहे.

सध्या बॉलीवूडला कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या एक दोन दिवसांपासून मोठमोठ्या सेलिब्रेटींना कोरोना झाला आहे. आता रणबीर कपूर सोबत संजय लीला भन्साळी यांचा कोविडचा रिपोर्ट पॉझिव्टिव्ह आला आहे. विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भन्साळी हे त्यांच्या गंगुबाई काठियावाडी चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहेत. त्यावेळी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण मुंबईतील फिल्म सिटीमध्ये सुरु आहे. मात्र आता ते चित्रिकरण थांबवण्यात आले आहे.

संजय लीला भन्साळी आता क्वोरोंटाईन झाले आहेत. फेब्रुवारी 24 पासून आलिया भट्ट हिची प्रमुख भूमिका असलेला गंगुबाई काठियावाडी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. त्याला मोठ्या प्रमाणात चाहत्यांचा प्रतिसाद मिळाला होता. काहींनी आलियाचे कौतूकही केले तर काहींनी तिला ट्रोलही. हुसैन जैदी यांच्या द माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकावर आधारित या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

भन्साळी यांचा हा चित्रपट खरं तर गेल्या वर्षी सप्टेंबर 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता. कोविडमुळे त्याचे प्रदर्शन रखडले. आता तो 30 जुलै 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहे.  भन्साळी पॉझिटिव्ह आल्यानंतर आलियानंही स्वतला क्वॉरंनटाईन केले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ती सुरक्षित असल्याची माहिती आहे.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com