esakal | 'कामाठीपुरा' नाव आम्हाला नको; गंगुबाई काठियावाडी चित्रपट 

बोलून बातमी शोधा

gangubai kathiyawadi movie kamithipura name remove people demand mns took initiative sanjay leela bhansali alia bhatt }

चित्रपटाचे प्रदर्शन आणि त्याचा वाद हे आता काही नवीन राहिले नाही.

manoranjan
'कामाठीपुरा' नाव आम्हाला नको; गंगुबाई काठियावाडी चित्रपट 
sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई- हल्ली कुठलाही चित्रपट अथवा वेबसीरिज प्रदर्शित होण्याच्या अगोदर त्याच्याभोवती वाद रंगत असल्याचे पाहायला मिळते. प्रसिध्द दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा गंगुबाई काठियावाडी नावाचा चित्रपट आता प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा टीझर प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र कामाठीपु-यातील नागरिकांनी चित्रपटाच्या नावावर आक्षेप घेऊन नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्यामुळे येत्या काळात भन्साळी यांच्या या चित्रपटासमोरील अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान कामाठीपु-यातील रहिवाशांनी मनसेकडे यासंदर्भात दाद मागितली आहे.

चित्रपटाचे प्रदर्शन आणि त्याचा वाद हे आता काही नवीन राहिले नाही. चित्रपटाचे नाव, त्यातील कथानक, पात्रांची नावे, घटनास्थळांची नावे, संवाद यावरुन वेगवेगळ्या प्रकारचे वाद आतापर्यत समोर आले आहेत. भन्साळी यांच्या गंगुबाई काठीयावाडी चित्रपटातील कामाठीपु-याचा उल्लेख वगळावा अशी मागणी तेथील रहिवाशांनी मनसेकडे केली आहे. या भागात राहत असल्याने विविध प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागत असून आता नव्यानं प्रदर्शित होणा-या चित्रपटानं आमच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची भीती तेथील रहिवाशांनी केली आहे.

दरम्यान कामाठीपु-यातील रहिवाशांनी मनसे चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. याप्रकरणात मनसे काय भूमिका घेणार हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे. यावेळी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्याकडे यांच्याशी बोलून तोडगा काढण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.  तसेच ‘कामाठीपुरा’ हा उल्लेख चित्रपटातून काढावा अशी मागणी भन्साळी यांच्याकडे करणार असल्याची माहिती हाती आली आहे. या चित्रपटात बॉलिवूडमधील अभिनेत्री आलिया भट्ट या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे.

हुसेन झैदी यांच्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई नावाच्या पुस्तकावर आधारित या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. आता त्यावरुन नवा वाद सुरु झाला आहे. आलियालाही अनेक नेटक-यांनी तिच्या नव्या भूमिकेवरुन ट्रोल केले आहे. गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटावर आक्षेप घेण्याची ही पहिली वेळ नाही. या आधी खुद्द गंगूबाई यांच्या मुलाने देखील या चित्रपटाच्या कथेवर आक्षेप घेतला होता. हा चित्रपट 30 जुलै 2021 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.