
Ganpath Movie Trailer Tiger Shroff Amitabh Bachchan : बॉलीवूडचा प्रसिद्ध अॅक्शनहिरो टायगर श्रॉफच्या गणपथचा ट्रेलर आता प्रेक्षकांसमोर आला असून त्यानं लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांना आणि टायगरच्या चाहत्यांना गणपथच्या ट्रेलरची उत्सुकता होती. त्यावर नेटकऱ्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया भन्नाट आहेत.
बॉलीवूडमध्ये आपल्या अॅक्शननं प्रेक्षकांना नेहमीच खुश करणाऱ्या टायगरचा या चित्रपटातील अंदाज हा भलताच तिखट आहे. त्यानं यापूर्वी वेगवेगळ्या अॅक्शनपटांमध्ये काम केले आहे.आज हॉलीवूडच्या धर्तीवर बॉलीवूडमध्ये दोनच अभिनेत्यांचे नाव अग्रक्रमानं घेतले जाते. त्यात पहिल्या क्रमांकावर विद्युत जामवाल आणि दुसऱ्या स्थानी टायगर श्रॉफचे नाव घ्यावे लागेल.
यावेळी टायगरसोबत प्रमुख अभिनेत्री म्हणून क्रिती सेनन दिसणार आहे. यापूर्वीच्या त्याच्या अॅक्शन चित्रपटांमध्ये दिशा पटानीनं काम केलं होतं. मात्र या दोन्ही सेलिब्रेटींमध्ये ब्रेक अप झाल्याच्या बातम्यांना उधाण आल्यानं टायगर आणि क्रिती सेनॉन यांच्या जोडीनं प्रेक्षकांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. गेल्या वर्षी गणपथचा फर्स्ट लूक आणि टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता तेव्हापासून हा चित्रपट प्रेक्षकांच्या चर्चेचे कारण ठरतो आहे.
आता तर अडीच मिनिटांच्या या ट्रेलरनं प्रेक्षकांनी दिलेल्या कमेंटसवरुन टायगरची लोकप्रियता कळून येते. ऑक्टोबरच्या २० तारखेला प्रदर्शित होणार असून तो हिंदी, मल्याळम, कन्नड, तेलुगू आणि तमिळ भाषांमधूनही प्रेक्षकांसमोर येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक विकास बहल यांनी केले आहे.ज्यांनी यापूर्वी कंगनाच्या क्वीनचे दिग्दर्शन केले आहे.
बिग बी अमिताभ बच्चन देखील या चित्रपटामध्ये एका महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अमिताभ यांनी टायगर श्रॉफ हे पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेयर करताना दिसणार आहे. टायगरसाठी हा मोठा अनुभव असणार आहे. त्यामुळे येत्या काळात गणपथ प्रेक्षकांच्या पसंतीला पात्र ठरणार का हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.