"गणपती बाप्पा मोरया'मध्ये नवा प्रयोग 

वृत्तसंस्था
सोमवार, 6 मार्च 2017

"गणपती बाप्पा मोरया...' ही महेश कोठारे यांची निर्मिती असलेली मालिका सुरुवातीपासूनच नवनवीन प्रयोगांसाठी चर्चेत होती. मग ते ग्राफिक्‍स असो किंवा बोलताना डुलणारी गणपतीची सोंड असो. या मालिकेने आतापर्यंत दर्जेदार पद्धतीने रसिकांसमोर खरेखुरे चित्र उभे करत मनोरंजन केले आहे. सध्या मालिकेत सतीची गाथा दाखवली जात आहे. यात पद्मनाभ मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा प्रसंग दाखवण्यात आला. यासाठी विष्णूची भूमिका करणाऱ्या निरंजन कुलकर्णीला संपूर्ण शरीर रंगवावे लागले. या भूमिकेसाठी निरंजनला मेकअपकरता पाच तास लागले. मेकअपनंतर निरंजनला चित्रीकरण संपेपर्यंत मूर्तीरूपातच बसावे लागले होते.

"गणपती बाप्पा मोरया...' ही महेश कोठारे यांची निर्मिती असलेली मालिका सुरुवातीपासूनच नवनवीन प्रयोगांसाठी चर्चेत होती. मग ते ग्राफिक्‍स असो किंवा बोलताना डुलणारी गणपतीची सोंड असो. या मालिकेने आतापर्यंत दर्जेदार पद्धतीने रसिकांसमोर खरेखुरे चित्र उभे करत मनोरंजन केले आहे. सध्या मालिकेत सतीची गाथा दाखवली जात आहे. यात पद्मनाभ मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा प्रसंग दाखवण्यात आला. यासाठी विष्णूची भूमिका करणाऱ्या निरंजन कुलकर्णीला संपूर्ण शरीर रंगवावे लागले. या भूमिकेसाठी निरंजनला मेकअपकरता पाच तास लागले. मेकअपनंतर निरंजनला चित्रीकरण संपेपर्यंत मूर्तीरूपातच बसावे लागले होते. मराठी वाहिनीवरील हा पहिल्याच प्रयोग होता. 

Web Title: Ganpati bappa morya serial new experiment