Gashmeer Mahajani: वडीलांच्या निधनानंतर गश्मीर महाजनीने घेतलाय कामातुन ब्रेक, सोशल मिडीयावर म्हणाला...

वडील रविंद्र महाजनींच्या निधनानंतर गश्मीर महाजनीने कामातुन ब्रेक घेतलाय. हे आहे कारण
gashmeer mahajani taking break from work after his father ravindra mahajani death
gashmeer mahajani taking break from work after his father ravindra mahajani death SAKAL

Gashmeer Mahajani News: गश्मीर महाजनी सतत चाहत्यांच्या संपर्कात असतो. गश्मीरला आपण विविध सिनेमा, मालिकांमधुन अभिनय करताना पाहिलंय. गश्मीरचे वडील रविंद्र महाजनी यांचं ११ जुलैला निधन झालं.

रविंद्र महाजनींच्या अकस्मात निधनानंतर गश्नीरच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. गश्मीरने यानिमित्त सोशल मिडीयावर त्याच्या फॅन्ससोबत संवाद साधला.

(gashmeer mahajani taking break from work)

gashmeer mahajani taking break from work after his father ravindra mahajani death
Rocky Aur Rani Ki Prem Kahani: मराठमोळ्या क्षिती जोगचं दिग्दर्शक करण जोहरने केलं कौतुक, म्हणाला..

वडीलांच्या निधनानंतर गश्मीरने घेतला कामातुन ब्रेक

गश्मीर महाजनीने वडील रविंद्र महाजनींच्या निधनानंतर सोशल मिडीयाच्या माध्यमातुन चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी गश्मीरने वडीलांच्या निधनानंतर कामातुन ब्रेक घेतला असल्याचं सांगीतलं आहे.

गश्मीरला एका युजरने सध्या कसा आहेस?  असा प्रश्न विचारला. त्यावेळी गश्मीर म्हणाला.. "आई हळूहळू बरी होत आहे, आम्ही यातून बाहेर येऊ."

याशिवाय एका फॅनने गश्मीरला विचारलं, तू शूटिंगला सुरुवात केलीस का? या प्रश्नावर गश्मीरने उत्तर देऊन सपोर्ट केला, "अजुन तरी नाही.. पण माझ्या आईची तब्येत पूर्णपणे बरी झाल्यानंतर लवकरच सुरुवात करेन."

वडीलांच्या निधनानंतर या कलाकारांनी केला गश्मीरला सपोर्ट

गश्मीरने सोशल मिडीयावर त्याच्या चाहत्यांसोबत प्रश्न - उत्तरांचं सेशन केलं. यावेळी गश्मीरला त्याच्या फॅन्सनी अनेक प्रश्न विचारले. एका फॅनने गश्मीरला प्रश्न विचारला.

या कठीण दिवसांमध्ये मराठी इंडस्ट्रीने सपोर्ट केला का? असा प्रश्न गश्मीरने विचारला.

या प्रश्नावर गश्मीरने उत्तर दिलं.. मराठी इंडस्ट्रीतील काही मोजक्या आणि समजुतदार लोकांनी या कठीण काळात साथ दिली. विशेष म्हणजे प्रवीण तरडे, रितेश देशमुख आणि मृण्ययी देशपांडे. ही फार चांगली माणसं आहेत. आणि त्यांना विसरणं शक्य नाही.

वडीलांच्या निधनानंतर काय म्हणाला होता गश्मीर?

गश्मीर महाजनीने वडील रविंद्र महाजनींच्या निधनाबद्दल सोशल मिडीयावर पोस्ट करुन लिहीलं होतं की... ताऱ्याला ताऱ्यासारखंच राहू द्या.. मी आणि माझे कुटूंबीय आम्ही शांतच राहणं पसंत करतोय.

जर माझ्या शांत राहण्याने मला वाईट आणि मानहानी पत्करावी लागत असेल तर इतर कोणत्याही गोष्टीप्रमाणे याचा मी स्वीकार करतो.. जे गेलेत त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. ओम शांती.

ते माझे वडील होते. माझ्या आईचे पती होते. आणि तुमच्या कोणाही पेक्षा आम्ही त्यांना चांगलं ओळखतो. कदाचित योग्य वेळ आली की मी भविष्यात याविषयी बोलेन. अशी पोस्ट करत गश्मीरने मनातल्या भावना व्यक्त केल्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com