गश्मीरने का सोडली 'इमली' मालिका? अखेर समोर आलं कारण | Gashmeer Mahajani | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gashmeer Mahajani

गश्मीरने का सोडली 'इमली' मालिका? अखेर समोर आलं कारण

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता गश्मीर महाजनीच्या (Gashmeer Mahajani) 'इमली' (Imlie) या हिंदी मालिकेनं प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली. या मालिकेत गश्मीरने आदित्य या पत्रकाराची भूमिका साकारली. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याच्या भूमिकेबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गश्मीरने या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. गश्मीरने ही मालिका सध्या सोडली आहे. 'इमली' या मालिकेत गश्मीरसोबत सुंबुल आणि मयुरी देशमुख यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

मालिका सोडण्यामागचं कारण सांगताना गश्मीर म्हणाला, "फक्त निर्माते गुल खान यांना आणि मलाच मालिका सोडण्यामागचं कारण माहीत आहे. ते कारण आम्हा दोघांमध्येच राहील. मात्र मी दु:खी मनाने मालिका नक्कीच सोडली नाही. खरंतर गुल आणि मी आधीच ठरवलं आहे की आम्ही भविष्यात आणखी कोणत्यातरी प्रोजेक्टवर काम करू. कोण म्हणतं मी नाराज होऊन मालिका सोडली? अजिबात नाही. तसंच, माझ्या तारखांच्या समस्या कधीच नव्हत्या. मी शोसाठी तारखा देऊ शकत नसल्याच्या सर्व चर्चा खोट्या आहेत."

हेही वाचा: पार्टी करण्यासाठी, पैसे उधळण्यासाठी लग्न केलं- अंकिता लोखंडे

"मी खूप आत्मकेंद्रीत व्यक्ती आहे (हसतो), त्यामुळे माझी जागा मालिकेत कोण घेईल याने काही फरक पडत नाही. पण, मला हा शो यशाचे विविध टप्पे गाठताना पाहायचा आहे आणि त्यामागचं एक कारण म्हणजे सुंबुल. तिचं काम अप्रतिम आहे आणि गेल्या वर्षभरात एक अभिनेत्री म्हणून ती खूप शिकली आहे. सुंबुलसाठी मी हा शो नक्कीच पाहीन आणि तिने तिच्या करिअरमध्ये उत्कृष्ट कामगिरी करावी अशी माझी इच्छा आहे. गश्मीर पुढील चार महिन्यांसाठी वेब शोवर काम करणार आहे. त्यानंतर एखादी चांगली स्क्रिप्ट मिळाल्यास मालिकेकडे परतणार असल्याचं त्याने सांगितलं.