अभिनेत्री गौरी कुलकर्णी साकारणार 'अबोली' | Aboli | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aboli serial

अभिनेत्री गौरी कुलकर्णी साकारणार 'अबोली'

sakal_logo
By
स्वाती वेमूल

स्टार प्रवाह Star Pravah वाहिनीवर लवकरच 'अबोली' Aboli ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिकेच्या शीर्षकाप्रमाणेच ही गोष्ट अबोली नावाच्या मुलीच्या संघर्षाची आहे. अभिनेत्री गौरी कुलकर्णी Gauri Kulkarni अबोली ही व्यक्तिरेखा साकारणार असून गौरी ही भूमिका साकारण्यासाठी ती खूपच उत्सुक आहे.

या भूमिकेविषयी सांगताना गौरी म्हणाली, "अबोली मालिकेच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच स्टार प्रवासोबत काम करतेय याचा आनंद आहे. अबोली ही अतिशय साधी मुलगी आहे. नावाप्रमाणेच अबोल, कमी बोलणारी. तिचं असं वेगळं जग आहे ज्यात ती रमते. खरंतर तिला तिचं म्हणणं मांडायचं असतं मात्र तिला ते मांडू दिलं जात नाही. माझ्यासाठी ही अतिशय आव्हानात्मक भूमिका आहे. कारण मला बोलायला खूप आवडतं. सेटवर माझी अखंड बडबड सुरु असते. अबोली मात्र मितभाषी आहे. त्यामुळे अबोली साकारणं माझ्यासाठी नवं आव्हान आहे."

हेही वाचा: 'तुझ्यापेक्षा आमची मोलकरीण चांगली दिसते' म्हणणाऱ्याला स्वराचं सडेतोड उत्तर

सचित पाटील, प्रतिक्षा लोणकर, मौसमी तोंडवळकर, शर्मिष्ठा राऊत, संदेश जाधव, अपर्णा अपराजित, अंगद म्हस्कर, दीप्ती लेले अशी दमदार कलाकारांची फौज या मालिकेत आहे. ही नवी मालिका मंगळवार २३ नोव्हेंबरपासून रात्री १०.३० वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

loading image
go to top