Gautami Patil Lavni ...dancer...Controversy interview
Gautami Patil Lavni ...dancer...Controversy interviewInstagram

Gautami Patil ने सांगितला भूतकाळ; म्हणाली,'आजची ओळख नकोशी वाटते..'

अश्लील नृत्य करते,लावणीचा दर्जा घसरवते असे आरोप ज्या गौतमी पाटीलवर केले जातायत तिचं म्हणणं आहे मी जे नृत्य करते ते लावणी नाही,मला लाावणी नृत्य येतंच नाही.
Published on

Gautami Patil: गौतमी पाटील हे नाव गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचलंय. इतकेच नव्हे तर गौतमी पाटीलने आजवर तिच्या नृत्याने आणि दिलखेचक अदाकारीने महाराष्ट्रातील तरुणांना वेड लावले आहे. इतकी प्रसिद्धी तिला मिळाली आहे तरी आज गौतमी पाटील म्हणते मला माझी जुनी ओळख आवडते.(Gautami Patil Lavni ...dancer...interview)

Gautami Patil Lavni ...dancer...Controversy interview
Tunisha Sharma च्या आत्महत्येनंतर कलाकार संघटनेचा मोठा निर्णय; म्हणाले,'आता निर्मात्यांवर सक्ती करणार...'

आपल्या अदानी तरुणांना घायाळ करणारी गौतमी पाटील सध्या चांगलीच चर्चेत आहे .गौतमी पाटीलच्या प्रत्येक कार्यक्रमांना तरूणांची तर हजेरी असते पण आता महिलांची देखील चांगलीच गर्दी होते. इतकेच नव्हेतर लावणीच्या नावाखाली अश्लील हावभाव करत असल्याने तिच्यावर लावणी कलावंत तसंच राजकारणातूनही जोरदार टीका होत आहे. तिरीही तिचे कार्यक्रम चांगलेच गाजत आहेत आणि प्रसिद्धि देखील तिला मिळत आहे. गौतमी पाटील आता सोशल मीडियावर ओळखीचा आणि प्रसिद्ध चेहरा बनली आहे. आपला डान्स आणि एक्स्प्रेशन्सने गौतमीने तरुणाईला वेड लावलं आहे.

साम टीव्हीनं 'सबसे कातील- गौतमी पाटील' या विशेष कार्यक्रमात गौतमीची मुलाखत घेतली. त्या मुलाखतीत गौतमी पाटीलन सांगितले,''आज मला खूप प्रसिद्धी मिळाली आहे , माझ्या नावाची चर्चा होत आहे. माझ्या डान्सचे अनेक चाहते आहेत. माझी फॅन फॉलोइंग पण जास्त आहे , पण मला माझी ही ओळख नकोशी वाटते कारण आता खुपच जास्त टेंशन वाढलंय..आत कसं प्रेक्षकांसमोर सादर व्हायचे याचा खूप विचार करावा लागतो,आधीच्या गौतमीला काही टेंशन नव्हते''.

Gautami Patil Lavni ...dancer...Controversy interview
Tejaswini Pandit: 'मला तू खूप आवडतोस पण...', तेजस्विनी पंडीतच्या पोस्टची सोशल मीडियावर रंगली चर्चा

२६ वर्षीय गौतमी ही डान्सर असून लावणी डान्सर म्हणून तिला ओळखलं जातं. यूट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या सोशल प्लॅटफॉर्मवर तिचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com