Raj Kundra case: व्हायरल मीम्सवर गहना वशिष्ठ म्हणते, 'प्रत्येकजण फायदा घेतोय'

'वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचा हा प्रकार आहे'
gehna raj
gehna raj

अडल्ट फिल्म रॅकेटप्रकरणी व्यावसायिक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा Shilpa Shetty पती राज कुंद्राच्या Raj Kundra अटकेनंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. राजला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर राज आणि शिल्पा शेट्टीवर अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. याप्रकरणी अभिनेत्री गहना वशिष्ठने Gehana Vasisth राज कुंद्राला पाठिंबा दिला आहे. 'पिंकविला' या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत गहनाने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मीम्सवर प्रतिक्रिया दिली आहे. (Gehana Vasisth reacts to memes about Raj Kundras arrest slv92)

"सोशल मीडियावर आता जे मीम्स व्हायरल होत आहेत, अशा प्रत्येक गोष्टीची एक लाट येते. लोकांना जी गोष्ट ट्रेंड होताना दिसते, त्यावर ते मीम्स बनवतात आणि व्हायरल करतात. कारण त्यांना पण पैसा कमवायचा असतो. वाहत्या गंगेत प्रत्येकजण हात धुवून घेत आहेत. प्रत्येकजण या गोष्टीचा फायदा घेत आहे", असं ती म्हणाली. अश्लील व्हिडीओ शूटप्रकरणी गहनाला अटक झाली होती. पाच महिने तुरुंगात राहिल्यानंतर गेल्या महिन्यात तिची जामिनावर सुटका झाली. "न्यायव्यवस्था या प्रकरणावर योग्य न्याय देईलच. आम्हाला मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे पण त्यांनी पॉर्न व्हिडीओ आणि बोल्ड व्हिडीओ यामध्ये गल्लत करू नये", अशी प्रतिक्रिया तिने राजच्या अटकेवर दिली.

gehna raj
राज कुंद्राने लॉकडाउनचा उचलला फायदा, दिवसाला करायचा लाखोंची कमाई

गहनाची अटक

४ फेब्रुवारी रोजी मढ येथील ग्रीन पार्क बंगला येथे मालमत्ता कक्षाने छापा टाकला, तेव्हा अर्धनग्न अवस्थेत तरुण-तरुणींच्या अश्लील कृत्याचे चित्रीकरण सुरू होते. त्यानुसार पथकाने दोन महिलांसह पाच जणांना अटक केली होती. या प्रकरणाच्या तपासात गहना वशिष्ठचे नाव समोर आले. गहना वेब सीरिज, शॉर्ट फिल्मच्या नावाखाली पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करून ते वेब साइटवर अपलोड करायची, असा तिच्यावर आरोप आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com