esakal | "पॉर्न आणि बोल्ड व्हिडीओ यात फरक"; राज कुंद्राच्या अटकेवर गहना वशिष्ठची प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

Gehana Vasisth

"पॉर्न आणि बोल्ड व्हिडीओ यात फरक"; राज कुंद्राच्या अटकेवर गहना वशिष्ठची प्रतिक्रिया

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा Shilpa Shetty पती राज कुंद्राला Raj Kundra अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणी सोमवारी रात्री अटक झाली. या अटकेवर अभिनेत्री गहना वशिष्ठने Gehana Vasisth प्रतिक्रिया दिली आहे. याचप्रकरणी गहनालासुद्धा अटक करण्यात आली होती. गेल्या महिन्यात गहनाची जामिनावर सुटका झाली. पॉर्न आणि बोल्ड व्हिडीओ यांच्यामध्ये फरक असल्याची प्रतिक्रिया गहनाने राजच्या अटकेवर दिली. 'झूम' या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, "न्यायव्यवस्था या प्रकरणावर योग्य न्याय देईलच. आम्हाला मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे पण त्यांनी पॉर्न व्हिडीओ आणि बोल्ड व्हिडीओ यामध्ये गल्लत करू नये." (Gehana Vasisth reacts to Raj Kundras arrest slv92)

"आम्ही सतत म्हणत आलो आहोत की मुंबई पोलीस ही जगातील सर्वोत्कृष्ट पोलीस यंत्रणा आहे. न्यायालयात सुनावणीदरम्यान बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील आणि खरे गुन्हेगार कोण आहेत याचा निर्णय न्यायालयात होईल", असं ती पुढे म्हणाली. अटकेनंतर गहना पाच महिने तुरुंगात होती आणि त्यावेळी तिने फोन, लॅपटॉप्स जप्त करण्यात आले होते. "गेल्या सहा महिन्यांपासून मी माझं आयुष्य जगायलाच विसरले आहे. माझं संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त केलंय", असं तिने सांगितलं.

हेही वाचा: पॉर्न फिल्म्स प्रकरणी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक!

गहना वशिष्ठची काय भूमिका?

राज कुंद्राला ज्या पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली, त्याचा तपास या वर्षाच्या सुरुवातीपासून सुरु आहे. यामध्ये मॉडेल व अभिनेत्री गहना वशिष्ठसह नऊ जणांना अटक करण्यात आली. युकेमधील प्रॉडक्शन कंपनी केनरीनचा सहभाग समोर आल्यानंतर राज कुंद्राचे नाव समोर आले. पोलिसांनी अधिकारी उमेश कामतला अटक केली. तो आधी राज कुंद्राकडे काम करायचा. गहना वशिष्ठने शूट केलेले आठ अश्लील पॉर्नोग्राफीक व्हिडिओ सोशल मीडिया अ‍ॅपवर अपलोड केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. केनरीनमध्ये राज कुंद्रा भागीदार असल्याचा पोलिसांना संशय आहे.

गहनाची अटक

४ फेब्रुवारी रोजी मढ येथील ग्रीन पार्क बंगला येथे मालमत्ता कक्षाने छापा टाकला, तेव्हा अर्धनग्न अवस्थेत तरुण-तरुणींच्या अश्लील कृत्याचे चित्रीकरण सुरू होते. त्यानुसार पथकाने दोन महिलांसह पाच जणांना अटक केली होती. या प्रकरणाच्या तपासात गहना वशिष्ठचे नाव समोर आले. गहना वेब सीरिज, शॉर्ट फिल्मच्या नावाखाली पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करून ते वेब साइटवर अपलोड करायची, असा तिच्यावर आरोप आहे.

loading image