esakal | 'नवीन अ‍ॅपसाठी राज कुंद्राने शमिता शेट्टी, सई ताम्हणकरचा केला होता विचार'
sakal

बोलून बातमी शोधा

raj shamita sai

'नवीन अ‍ॅपसाठी राज कुंद्राने शमिता शेट्टी, सई ताम्हणकरचा केला होता विचार'

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अश्लील चित्रफितनिर्मिती आरोपप्रकरणी अटकेत असलेला राज कुंद्रा नवीन अ‍ॅप लाँच करण्याच्या तयारीत होता, अशी माहिती अभिनेत्री गहना वशिष्ठने दिली. या अ‍ॅपमध्ये चॅट शो, रिअ‍ॅलिटी शो, म्युझिक व्हिडीओ आणि फिचर फिल्म्सचा समावेश करण्यात येत होता, असंही तिने सांगितलं. त्यातीलच एका चित्रपटासाठी अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टीला भूमिका देण्याचा विचार होता. तर दुसऱ्या एका स्क्रिप्टसाठी मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरचाही विचार केल्याचं गहनाने सांगितलं.

'नवभारत टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत गहना म्हणाली, "राज कुंद्राच्या अटकेच्या काही दिवस आधी मी त्याच्या ऑफिसमध्ये गेले होते. तेव्हा मला बॉलिफेम या अ‍ॅपविषयी समजलं. हा नवीन अ‍ॅप लाँच करण्याची प्लॅनिंग ते करत होते. चॅट शो, रिअ‍ॅलिटी शो, म्युझिक व्हिडीओ आणि फिचर फिल्म्सचा अ‍ॅप त्याला लाँच करायला होता. यामध्ये बोल्ड दृश्ये समाविष्ट करण्याचा कुठेच त्याचा विचार नव्हता. आम्ही स्क्रिप्टवरही चर्चा केली होती. त्यातील एका स्क्रिप्टसाठी आम्ही शमिता शेट्टीचा विचार केला तर दुसऱ्या स्क्रिप्टसाठी सई ताम्हणकर आणि दुसऱ्या कलाकारांचा विचार होता. मी या चित्रपटांचं दिग्दर्शन करणार होते आणि त्याच्या अटकेपूर्वी आम्ही याच विषयावर चर्चा करत होतो."

हेही वाचा: राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीची पहिली पोस्ट

राज कुंद्राचा 'प्लॅन बी' होता तयार

पोलीस कारवाईच्या भीतीने राज कुंद्राने आधीच प्लॅन बी तयार केला होता. व्हॉट्सअप चॅटमधून याचा खुलासा झाला. 'हॉटशॉट्स' हे अ‍ॅप रद्द केले तरी इतर माध्यमातून अश्लील चित्रफितींचा व्यवसाय सुरूच ठेवण्याचा प्रयत्न कुंद्राकडून सुरू असल्याचे समोर आले. 'गुगल प्ले स्टोअर' या अ‍ॅप्लिकेशनच्या नियमावलीचे उल्लंघन केल्यामुळे 'हॉटशॉट्स' हे अ‍ॅप 'प्ले स्टोअर'वरून काढून टाकण्यात आले होते. कुंद्रा सहभागी असलेल्या 'एच अकाऊंट्स' या व्हॉट्सअप ग्रुपमधील चॅटमधून हे समोर आले.

loading image
go to top