Happy Birthday Riteish : जेनेलियाच्या रोमँटीक शुभेच्छांनी रितेशचा 'दिन बन गया'!

Genelia DSouza wishes Riteish Deshmukh on his birthday
Genelia DSouza wishes Riteish Deshmukh on his birthday
Updated on

मुंबई : बॉलिवूडमधील हटके अभिनेता म्हणून चाहत्यांचा फेव्हरेट असलेल्या रितेश देशमुखचा आज 41वा वाढदिवस! सोशल मीडियावर आज त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. पण एका खास शुभेच्छांमुळे त्याचा दिवसही खास झालाय. या शुभेच्छा दुसऱ्या तिसऱ्या कोणाच्या नसून त्या वहिनी जेनेलिया देशमुख यांच्या आहेत!

रितेश-जेनेलिया हे बॉलिवूडमधलं सर्वात क्यूट कपल म्हणून ओळखलं जातं. त्यांची प्रेमकहाणी सर्वश्रूत आहे. जेनेलिया नेहमीच रितेशवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसते, आजही तिने रितेशला एकदम रोमँटिक शुभेच्छा देऊन खूश केलंय. जेनेलियाने तिचा, रितेशचा आणि रिहान-राहीलचा एक क्यूट फोटो शेअर केलाय. या फोटोसोबत तिने रितेशला रोमँटीक शुभेच्छा दिल्यात. 'तू कायम माझा आहेस. तू 100 वर्षांचा झालास तरी मी हेच म्हणेन. तू आजही माझा आहेस आणि कायम माझाच राहशील. वाढदिवसाच्या शुभेच्छा... - कायम तुझीच' असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.

काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचा मुलगा रितेश व अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांची प्रेमकाहाणी आणि विवाहसोहळ चांगलाच गाजला होता. 'तुझे मेरी कसम' या चित्रपटात हे दोघे पहिल्यांदा दिसले होते. त्यानंतर मस्तीमध्ये त्यांची केमिस्ट्री आपण पाहिली होती.

दोघंही सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह असतात. त्या दोघांची फॅन फॉलोविंगही मोठ्या प्रमाणात आहे. रितेशच्या वाढदिवसानिमित्त जेनेलियाने केलेल्या या ट्विटची चर्चा सध्या सगळीकडे होतीय.  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

I like us... #partnerforlife #mostfavouriteperson #cantgoadaywithoutyou

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad) on

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com