देशमुख बाईंचा स्वॅगच वेगळा, मराठी टिक टॉक व्हिडीओने केला धुरळा

Genelia d'souzas new tik tok video gone viral
Genelia d'souzas new tik tok video gone viral
Updated on

मुंबई : बॉलिवूडमधलं क्यूट कपल अशी ओळख असलेल्या रितेश देशमुख आणि जेनेलियाच्या आज लग्नाचा वाढदिवस! 2012मध्ये विवाहबद्ध झालेलं हे जोडपं आता संसाराची 8 वर्षे पूर्ण करत आहेत. या दोघांकडेही नेहमी एक आदर्श कपल म्हणून बघितलं जातं. रितेश-जेनेलिया आणि त्यांची दोन मुलं रियान-राहिल यांच्या चौकोनी आणि गोड कुटूंबाचं नेहमीच सगळ्यांना कौतुक राहिलं आहे. नुकताच जेनेलियाने एक धमाकेदार टिक टॉक व्हिडीओ शेअर केला आहे. तो एकदा पाहाच !

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

When can’t have find sunshine, be the sunshine 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad) on

जेनेलियाने नुकत्याच शेअर केलेला हा व्हिडीओ मराठीत आहे. ज्यामध्ये गॉगल लावलेली जेनेलिया दबंगपेक्षा लेडीपेक्षा कमी दिसत नाहीए. या व्हिडीओमध्ये मुलांना निशाणा साधणारी एक मजेशीर ओळ आहे. ज्यात जेनेलिया म्हणते, 'तुझ्या घरात चार दिवस लाइट नाही ते पाहीना. अरे जेवढे कावळे काव काव करीत नाहीत, जेवढे पोरं पोरींच्या कमेंटवर वाह वाह करतात''. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

देशमुख साहेब @riteishd

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad) on

हा डायलॉग मराठी  लोकप्रिय कॉमेडी शो 'चला हवा येऊ द्या' यामधला आहे. पण, त्यावर अभिनय करत जेनेलियाने कमाल हावभाव दिले आहेत. अवघ्या काही तासातंच त्यावर कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव चाहत्यांनी केलाय. जेनेलियाने नवरा रितेशला टॅग करत कॅप्शनमध्ये 'देशमुख साहेब' असं म्हणटलं आहे. हा टिक टॉक व्हिडीओ सध्या खूप व्हायर होताना दिसतोय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy Anniversary Baiko @geneliad

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd) on

रितेश आणि जेनेलिया यांनी 'तुझे मेरी कसम' या चित्रपटात पहिल्यांदा काम केलं होतं. आणि तेव्हापासूनच त्यांचे अफेअर सुरू होते. 10 वर्षांनंतर 2012 मध्ये ही जोडी लग्नबेडीत अडकली. ख्रिश्चन आणि मराठी पद्धतीने त्यांनी लग्न केले. त्यामुळे देशमुख कुटुंबीय प्रत्येक सण त्यांच्या घरी तेवढ्याच उत्साहात साजरे करतात. सध्या ते अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी गोव्याला गेले आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Every woman needs a man that will ruin their lipstick not their mascara.. @riteishd

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad) on

रितेश आणि जेनेलिया या दोघांच्या वाढदिवसाच्या आणि अॅनिव्हर्सरीच्या पोस्ट नेहमीच हटके असतात. आजही दोघांनी 'लय भारी' पद्धतीने एकमेकांना शुभेच्छा दिल्यात. एक मजेशीर टिकटॉक व्हिडीओ या दोघांनी शेअर केला आणि तो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com