'तारक मेहता..'मधील 'नट्टू काकां'चे निधन

कर्करोगामुळे त्यांनी मालिकेच्या कामातून घेतला होता ब्रेक
Ghanshyam Nayak
Ghanshyam Nayak
Updated on

'तारक मेहता का उल्टा चष्मा' Taarak Mehta Ka Ooltah Chashmah या मालिकेत नट्टू काकांची Nattu Kaka भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते घनश्याम नायक Ghanshyam Nayak यांचे निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. २ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५.३० वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. छोट्या पडद्यावरील या लोकप्रिय मालिकेत घनश्याम यांनी गेली अनेक वर्षे नट्टू काकांची भूमिका साकारली होती. त्यांच्या निधनाने मनोरंजनविश्वात शोककळा पसरली आहे. "त्यांच्या निधनाच्या वृत्ताने आम्हाला खूप मोठा धक्का बसला आहे", अशा शब्दांत मालिकेत रोशन सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने शोक व्यक्त केला. घनश्याम यांनी इतरही हिंदी आणि गुजराती मालिका, चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. त्यांनी 'खिचडी' आणि 'साराभाई वर्सेस साराभाई' या मालिकांमध्येही काम केलं होतं.

मालिकेत नट्टू काका आणि बागा यांच्या जोडीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. बागाची भूमिका साकारणारा अभिनेता तन्मय वेकेरिया म्हणाला, "त्यांच्या मुलाने मला फोन करून त्यांच्या निधनाचं वृत्त सांगितलं. काही महिन्यांपूर्वी त्यांना कर्करोगामुळे रुग्णालयात दाखल करावं लागतं. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली होती. घनश्याम माझ्या आयुष्यातील सर्वांत जवळची व्यक्ती होती. आजारपणातही त्यांनी सर्वोत्तम काम करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने मी खूप खचलो आहे."

Ghanshyam Nayak
'तारक मेहता..'च्या 'बबिता'चं मानधन माहितीये का?

कर्करोगामुळे मालिकेतून घेतला होता ब्रेक

घनश्याम यांना कर्करोग झाला होता. त्यामुळे त्यांनी मालिकेतून काही दिवस ब्रेक घेतला होता. याविषयी एका मुलाखतीमध्ये त्यांच्या मुलाने सांगितले होते, "माझे वडील हे कर्करोगाशी झुंज देत आहेत. त्यांची केमोथेरपी सुरु आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. पण आम्हाला कोणतीही रिस्क घ्यायची नाही. डॉक्टरांचे उपचार सुरू आहेत. याआधी त्यांच्या ज्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, आता त्याच रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.' सप्टेंबर २०२०मध्ये घनश्याम यांना कर्करोग झाल्याचे कळाले होते. त्यानंतर त्यांची सर्जरी झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com