

Amitabh Bachchan On Virender Sehwag : बॉलीवूडमध्ये सध्या वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळताना दिसत आहे. गदर २ ने तर प्रेक्षकांची प्रचंड वाहवा मिळवली आहे. यात अक्षयचा ओएमजी २ आणि रजनीचा जेलरही मागे नाही.
बिग बी अमिताभ बच्चन यांचे चिरंजीव अभिषेक बच्चनचा घूमर सध्या चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची चर्चा होती. एका महिला क्रिकेटपटूच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाचे प्रेक्षकांनी स्वागत केले आहे. प्रेक्षकांचा त्याला चांगला प्रतिसादही मिळताना दिसत आहे. त्याचा ट्रेलर पाहून नेटकऱ्यांनी अभिषेक आणि अभिनेत्री सयामीचं कौतुक केलं होतं.
Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ
अशातच भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सहवागने अभिषेकचा घूमरमधील अभिनय पाहून त्याचे कौतुक केले आहे. यावर बिग बी यांनी देखील वीरेंद्र सेहवागसाठी खास व्हिडिओ शेयर केला आहे. त्याची चर्चा सुरु झाली आहे. यापूर्वी भारताची माजी कर्णधार मोहमद अझरुद्दीन, महेंद्र सिंग धोनी, क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर यांच्या बायोपिकला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यात घूमरनं आपले वेगळेपण सिद्ध केले आहे.
सयामी खेरचा अभिनय तर प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. तिनं या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतल्याचे चित्रपट पाहताना दिसून येते. सेहवागनं सयामीचं कौतुक केलं आहे. याशिवाय सेहवागनं अभिषेकची स्तूती केली आहे. सेहवागनं त्याच्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले होते की, मी घूमर पाहिला आणि मला हा चित्रपट फारच आवडला. बऱ्याच दिवसांनंतर क्रिकेटशी संबंधित एखादी फिल्म पाहिली.
तुम्हाला हा चित्रपट पाहून क्रिकेटरचा संघर्ष किती कठीण असतो हे कळेल. खासकरुन जेव्हा तुम्हाला दुखापत होते तेव्हा तर तुम्ही कमबॅक करणे खरच खूप अवघड असते. घूमर पाहिल्यावर हे तुम्हाला कळेल. सयामी आणि अभिषेकचा अभिनय आवडला. ही भूमिका करणे आव्हानात्मक होते. त्यानं ती खूपच छान केली आहे.
तसं तर मी कधी कोचचं ऐकलं नाही पण घूमरमध्ये अभिषेकनं जो अभिनय केला आहे त्यामुळे तो जे सांगतो हे ऐकणे भाग आहे. यावर बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील सेहवागचे कौतूक केले आहे. ते म्हणाले, सेहवाग तू खूप साध्या शब्दांतून खूपच मोठी गोष्ट सांगितली. तुझे खूप खूप आभार....सध्या बिग बी यांचा तो व्हिडिओ देखील सोशल मीडियावर ट्रेंड होतो आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.