#Ghungroo 'घुंगरु' गाण्यावर नेटकरी फिदा

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांचा अॅक्शनपट असलेल्या 'वॉर' या चित्रपटातील 'घुंगरू' हे गाणं आज प्रदर्शित झालं.

मुंबई : हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांचा अॅक्शनपट असलेल्या 'वॉर' या चित्रपटातील 'घुंगरू' हे गाणं आज प्रदर्शित झालं. रिलीजनंतर काही वेळातच हे #Ghungroo सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. डान्समधला एक्सपर्ट हृतिक आणि क्यूट आणि हॉट अंदाजातील वाणी कपूर या गाण्यात दिसतात. 

घुंगरूमध्ये सगळ्यात आकर्षक घेतले आहेत, ते म्हणजे लोकेशन्स! इटलीच्या पॉसिटानोमधल्या अमाल्फीच्या बीचवर हे गाणं शूट करण्यात आलंय. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच हृतिक आणि टायगर एकत्र काम करताना दिसणार आहेत. हे गाणं अरिजीत सिंग आणि शिल्पा राव यांनी गायलं आहे. तर, विशाल शेखरने त्याला म्युजिक दिलं आहे. 'घुंगरू टूट गए' या जुन्या गाण्याचं हे रिमेक आहे. 

अवघ्या चार तासांतच या गाण्याला 21 लाख लोकांनी पाहिलं आहे. तर, 16 हजार पेक्षा जास्त कमेंट्स या गाण्यावर आल्या आहेत. एका व्यक्तीने या गाण्याविषयी कमेंट करताना लिहिलं आहे की, "घुंगरू या वर्षीचं सर्वात चांगचं पार्टी सॉंग आहे आणि त्याची सिगनेचर स्टेपदेखील तितकीच जबरदस्त आहे". या गाण्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची उत्सुकता अधिक वाढली आहे. हा सिनेमा 2 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ghungroo song trending on the internet, fans loving it