Fri, Jan 27, 2023

Gautami Patil : गौतमी पाटीलला पोलिस संरक्षण द्या; गौतमी पाटीलच्या समर्थनार्थ निदर्शनं
Gautami Patil : तिला पोलिस संरक्षण द्या; गौतमी पाटीलच्या समर्थनार्थ निदर्शनं
Published on : 28 December 2022, 10:17 am
गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमांवर बंदी घालण्याची सध्या मागणी होत आहे. या चर्चांमध्येच आता तिला पोलीस संरक्षण देण्याच्या मागणीसाठी निदर्शनं सुरू आहेत.
गौतमी पाटीलची तिच्या डान्समुळे सगळ्या महाराष्ट्रात क्रेझ आहे. पण काही लावणी कलावंत आणि संघटनांकडून तिच्यावर अश्लीलतेचे आरोप होत आहेत. त्यामुळे कार्यक्रमावर बंदी घालण्याचीही मागणी होत आहे.
हेही वाचा: Gautami Patil Interview : 'लोकांना कसं सांगू जशी गाणी वाजणार तशी मी नाचणार'! गौतमीची अनकट् मुलाखत वाचा
पण आता सांगलीमध्ये दलित महासंघटनेने आता गौतमी पाटीलला पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी जोरदार निदर्शनं केली आहेत. गौतमी पाटीलला पोलीस बंदोबस्त द्या, नाहीतर दलित महासंघाच्या युवकांसोबत तिच्या कार्यक्रमाठिकाणी बंदोबस्त करू, असा इशारा या संघटनेने दिला आहे.