
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता महाराष्ट्रात लॉकडाउन घोषित करण्यात आला. मालिकांचं काम थांबू नये यासाठी अनेक मालिकांची टीम गोव्यात स्थलांतरित झाली. मात्र आता गोव्यात Goa सुरू असलेल्या शूटिंगवरही गदा आली आहे. गोव्यातही वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मालिका आणि चित्रपटांच्या शूटिंगवर बंदी घालण्यात आली आहे. 'रंग माझा वेगळा', 'अग्गंबाई सूनबाई' Aggabai Sunbai, 'सुख म्हणजे नक्की काय असतं', 'सूर नवा ध्यास नवा', 'तू सौभाग्यवती हो', 'पाहिले न मी तुला' यांसारख्या मराठी मालिकांचं Marathi TV serials शूटिंग गोव्यात सुरू होतं. आता दहा मे पर्यंत या मालिकांचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे. (Goa government cancels permission for shooting what will happen to Marathi TV serials)
गोव्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. संसर्गाची साखळी रोखण्यासाठी गोवा सरकारने राज्यात लॉकडाउन जाहीर केला आहे. पण त्यातही पर्यटकांचं येणं-जाणं आणि मालिका-चित्रपटांचं शूटिंग सुरू होतं. सध्या गोव्यात तीसहून अधिक मालिका-चित्रपटांचं शूटिंग सुरू आहे. मराठीसोबतच अनेक हिंदी मालिकांच्या टीमसुद्धा तिथे स्थलांतरित झाल्या होत्या. 'गुम है किसी के प्यार मे', 'ये है चाहते', 'कुंडली भाग्य' या हिंदी मालिकांचं शूटिंग सुरू होतं. आता या सर्व मालिका शूटिंगसाठी कोणतं ठिकाण निवडणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
'सूर नवा ध्यास नवा' शोच्या सेटवर गोंधळ
गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी 'सूर नवा ध्यास नवा' या रिअॅलिटी शोच्या सेटवर गोंधळ घातला होता. या शोचं शूटिंग त्यांनी थांबवलं होतं. शूटिंगदरम्यान कोव्हिडसंदर्भातले कोणतेच नियम पाळले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.