Gandhi Godse Ek Yudh : गोडसे काही सुपारी किलर नव्हता.. 'गांधी-गोडसे'चे दिग्दर्शकाचं मोठं विधान.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

godse is not supari killer I sympathize with both Gandhi & Godse said director Rajkumar Santoshi  nsa95

Gandhi Godse Ek Yudh : गोडसे काही सुपारी किलर नव्हता.. 'गांधी-गोडसे'चे दिग्दर्शकाचं मोठं विधान..

gandhi godse ek yudh: सध्या बॉलीवुडमध्ये चर्चा आहे ती, राजकुमार संतोषी दिग्दर्शित 'गांधी गोडसे - एक युद्ध' या सिनेमाची. महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे हे दोन विषय जेव्हा जेव्हा समोर आले आहेत तेव्हा वाद, चर्चा होणे अटळ असते. गांधींच्या मारेकऱ्याची ही गोष्ट राजकुमार संतोषी मोठ्या पडद्यावर साकारणार आहेत. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, या निमित्ताने अनेक चर्चांना तोंड फुटले आहे.

(godse is not supari killer, I sympathise with both Gandhi & Godse said director Rajkumar Santoshi)

हेही वाचा: Majhi Tujhi Reshimgath: सांभाळून पळ! हाडं मोडतील.. हिल्स घालून पळणारी प्रार्थना बेहेरे झाली ट्रोल..

या सिनेमात चिन्मय मांडलेकर हा नथुराम गोडसेची भूमिका साकारणार आहे. चिन्मय साठी ही मोठी संधी असून त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. या हा चित्रपट येत्या 26 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्ताने जोरदार प्रमोशन सुरू आहे. या निमित्ताने गांधी आणि गोडसे यांच्या विषयी अनेक प्रश्न चिन्मयसह दिग्दर्शकाला विचारले जात आहेत. अशाच एका मुलाखतीत दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी मोठे विधान केले आहे.

हेही वाचा: Mahesh Kothare: मी दहावीत असताना.. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला 'धुमधडाका' चित्रपटाचा किस्सा

राजकुमार संतोषी म्हणाले, आपल्याला आजपर्यंत केवळ महात्मा गांधीच आणि त्यांचाच इतिहास माहीत आहे. पण आपण कधीच नथुराम विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. नथुराम गोडसेलाही त्याची बाजू आहे, त्याचे एक म्हणणे आहे. तेच मांडण्याचा माझा प्रयत्न आहे.

हेही वाचा: गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

गोडसे काही सुपारी किलर नव्हता. तो आपल्यासारखाच एक सामान्य माणूस होता. त्याने असं का केलं हे या चित्रपटात मांडलं आहे आणि गांधीजीची भूमिकाही मांडली आहे, आता ते योग्य की अयोग्य ही आपण ठरवायच आहे, मी फक्त जे घडलं ते मांडलं आहे. मी कोणत्याही एका बाजूचा नाही. मला दिग्दर्शक म्हणून दोघेही सारखेच आहे. महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांच्याबद्दल मला सारखी सहानुभूती आहे.