'गोल्डन बॉय' नीरजला आपल्या बायोपिकमध्ये कोण हवंय?

टोकियो ऑलिम्पिकमध्ये (tokiyo olympic 2020) सुवर्ण कामगिरी करणाऱ्या नीरज चोप्रावर neeraj chopra सध्या कौतूकाचा वर्षाव होताना दिसतो आहे.
neeraj chopra
neeraj chopra

टोकियो ऑलिम्पिकमध्ये (tokiyo olympic 2020) सुवर्ण कामगिरी करणाऱ्या नीरज चोप्रावर neeraj chopra सध्या कौतूकाचा वर्षाव होताना दिसतो आहे. त्याच्या या कामगिरीबदद्ल हरियाणा सरकारनं त्याला कोट्यवधीचं बक्षीसही दिलं आहे. अशा नीरजवर आता बॉलीवूडमध्येही चर्चा होताना दिसत आहे. अभिनव बिंद्रानंतर abhinav bindra गोल्डन कामगिरी करणाऱ्या नीरजनं केलेली कामगिरी देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी ठरली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी pm narendra modi यांनी देखील नीरजचे फोन करुन अभिनंदन केले आहे. सोशल मीडियावर नीरजच्या नावाचा बोलबाला असल्याचे दिसुन येत आहे.

सध्या नीरजवर बायोपिक biopic येणार या चर्चेला उधाण आले आहे. जेव्हा नीरजला त्याच्या बायोपिकमध्ये त्याला कुणाला पाहायला आवडेल असा प्रश्न विचारला त्यावर त्यानं दिलेलं उत्तर प्रेक्षकांना चक्रावून टाकणारं होतं. त्यानं सुरुवातीला देशाचे आभार मानले आहे. चाहत्यांना मनपूर्वक धन्यवाद दिले आहे. यासगळ्यांच्या सहकार्य आणि आशीर्वादाशिवाय काही शक्य झाले नसते अशी भावना त्यानं यावेळी व्यक्त केली होती. शनिवारचा दिवस देशासाठी आनंदाचा होता. नीरजनं जेव्हा गोल्ड मिळवल्याची बातमी व्हायरल झाली तेव्हा सोशल मीडियावर त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव सुरु झाला.

नीरजच्या अगोदर मीराबाई चानुनं वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य कामगिरी केली होती. त्यानंतर तिच्यावरही बायोपिकची घोषणा करण्यात आली. सध्या त्या चित्रपटाचे निर्माते मीराबाई चानूची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीच्या शोधात आहे. यापूर्वी देखील अनेक खेळांडूवर बायोपिकची घोषणा करण्यात आली आहे. भारतानं पहिल्यांदा जेव्हा क्रिकेट विश्वकरंडक जिंकला तेव्हा संघाचा कर्णधार असणाऱ्या कपिल देव यांच्यावरही बायोपिक येत्या काळात येणार आहे.

नीरजला त्याच्या बायोपिकमध्ये कोणत्या अभिनेत्याला पाहायला आवडेल, यावर त्यानं पहिल्यांदा उत्तर दिलं हरियाणाच्या रणदीप हुडाला ती भूमिका करताना पाहणं माझ्यासाठी आनंददायी असेल. त्यानंतर बॉलीवू़डच्या खिलाडीचा म्हणजे अक्षय कुमारच्या नावाचाही त्यानं उल्लेख केला. 2018 मध्ये त्याला एका मुलाखतीमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com