"इंडस्ट्रीत आपले पण परके होतात"; १६ कोटी रुपये गमावल्याचा गोविंदाचा आरोप

govinda
govinda

दमदार अभिनय, विनोदाची उत्कृष्ट शैली आणि जबरदस्त डान्सच्या जोरावर बॉलिवूडचा एक काळ गाजवणारा हिरो नंबर १ म्हणजेच गोविंदा. ९० च्या दशकात गोविंदाला प्रचंड स्टारडम मिळालं. पण नंतर ते टिकू शकलं नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गोविंदाने बॉलिवूड इंडस्ट्रीवर बरेच आरोप केले आहेत. इंडस्ट्रीतील काही लोकांनी माझ्याविरोधात कट रचला आणि जाणीवपूर्वक मला बाजूला ढकललं, असा आरोप त्यांनी केला आहे. यामुळे गोविंदाला बराच आर्थिक फटकासुद्धा बसला आहे. गोविंदाच्या 'कूली नंबर १' या चित्रपटाचा रिमेक काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. मात्र त्याला प्रेक्षक-समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाविषयीही गोविंदाने मत मांडलं. 

'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत गोविंदा म्हणाला, "तुम्ही मला कधीच कोणाविरोधात बोलताना पाहणार नाही. पण इतर लोकं माझ्याविरोधात खूप काही बोलतात. मी इतरांच्या कामाबद्दल कधीच वाईट बोलत नाही. कारण मी प्रत्येक व्यक्तीच्या मेहनतीचा आदर करतो. गेल्या १४-१५ वर्षांत मी खूप पैशांची गुंतवणूक केली होती आणि त्यातीत जवळपास १६ कोटी रुपयांचा तोटा मला झाला. इंडस्ट्रीतील काही लोकांनी मला वाईट वागणूक दिली होती. माझ्या चित्रपटांना थिएटर्स मिळत नव्हते आणि त्या लोकांना माझं करिअर उध्वस्त करायचं होतं. पण ते शक्य होऊ शकणार नाही. आता २०२१ या वर्षात मी पुन्हा नव्याने सुरुवात करणार आहे."

या मुलाखतीत त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीवर बरेच आरोप केले. "माझ्याविरोधात कट रचले जात होते. इथे आपले पण परके होतात. जर नशीब तुमच्या बाजूने नसेल तर तुमचे स्वत:चे लोक तुमच्याविरोधात होतात." याआधीही एका मुलाखतीत गोविंदाने दिग्दर्शक डेविड धवन यांच्याविरोधात वक्तव्य केलं होतं. गोविंदाने ९०च्या दशकात डेविड धवन यांच्यासोबत सुपरहिट चित्रपट दिले होते. मात्र या दोघांमध्ये नंतर वाद निर्माण झाला आणि त्यानंतर दोघांनीही एकमेकांसोबत काम करण्यात नकार दिला होता. बॉलिवूडमध्ये कोणत्याही ग्रुपचा भाग नसणं हे कारकिर्दीसाठी नुकसानकारक ठरल्याची खंत गोविंदाने व्यक्त केली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com