Grammy Awards 2024: वा उस्ताद वा! प्रसिद्ध तबलावादक झाकिर हुसैन यांना तीन ग्रॅमी! बासरीवादक 'राकेश चौरासिया' यांचाही गौरव

झाकीर हुसैन यांना बेस्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्ससाठी त्यांच्या पाश्तो (Pashto) नावाच्या अल्बमला गौरविण्यात आले.
Grammy 2024 Zakir Hussain 3 awards
Grammy 2024 Zakir Hussain 3 awards esakal

Grammy 2024 Zakir Hussain 3 awards : प्रसिद्ध संगीतकार शंकर महादेवन यांच्या शक्ती बँडच्या धीस मुवमेंट (Shankar Mahadevan from Shakti) अल्बमचा यंदाच्या ग्रॅमी २०२४ (Grammy 2024) मध्ये गौरविण्यात आले. याशिवाय इतर अनेक भारतीय कलाकारांना ग्रॅमीनं सन्मानित करण्यात आले आहे. त्यात सर्वाधिक चर्चा रंगतेय ती तीन ग्रॅमी आपल्या नावावर करणाऱ्या जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन (Zakir Hussain) यांची.

झाकीर हुसैन यांना बेस्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्ससाठी त्यांच्या पाश्तो (Pashto) नावाच्या अल्बमला गौरविण्यात आले. त्यात बेला फ्लेक, एडगर मेयर आणि प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरासिया यांच्या नावाचा समावेश होता. यंदाच्या ६६ व्या ग्रॅमी पुरस्कारामध्ये झाकीर हुसैन यांनी सादरीकरण केल्याचेही दिसून आले.

याशिवाय शंकर महादेवन यांच्या शक्ती बँडमधील धिस मुवमेंट या (Grammy for Best Global Music Performance ) अल्बमसाठी आणि अॅज वी स्पिक या अल्बमसाठी देखील झाकीर हुसैन आणि राकेश चौरासिया यांना गौरविण्यात आल्याचे दिसून आले. यानंतर सोशल मीडियावरुन शंकर महादेवन (Shankar Mahadevan), राकेश चौरासिया (Rakesh Chaurasia) आणि उस्ताद झाकीर हुसैन यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला आहे. यापूर्वी देखील ग्रॅमी पुरस्कारामध्ये बहारदार सादरीकरण केल्याचे दिसून आले आहे.

झाकिरजींना त्यांच्या पाश्तो नावाच्या अल्बमसाठी गौरविण्यात आले. त्यात त्यांच्यासोबत बेला फ्लेक, एडगर मेयर, बासरीवादक राकेश चौरासिया यांच्या नावाचा समावेश होता. शंकर महादेवन यांच्या धिस मुवमेंट देखील झाकिरजींची भूमिका महत्वाची ठरली. अशा प्रकारे यंदा तीन ग्रॅमी मिळाले असून राकेश चौरासिया यांना देखील दोन ग्रॅमीनं गौरविण्यात आले आहे.

Grammy 2024 Zakir Hussain 3 awards
Grammy Awards 2024: भारतीय संगीताचा मोठा गौरव, 'ग्रॅमी'वर उमटवली मोहोर! 'This Moment' ने मारली बाजी

भारतीय संगीतकारांनी विख्यात अशा ग्रॅमी पुरस्कारावर आपल्या देशाची मोहोर उमटविल्यानं देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असल्याचे दिसून आले आहे. यावेळी मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांचे कौतुक करणाऱ्या पोस्ट शेयर केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com