खुषखबर: GTGचा दुसरा भाग लवकरच; अंक तिसरामध्ये कलाकारांनी दिली माहिती.

सौमित्र पोटे/ कॅमेरा : योगेश बनकर.
रविवार, 20 ऑगस्ट 2017

या नाटकाचा अनुभव.. नाटक सुरू असतानाचे किस्से.. प्रेक्षकांचा या नाटकाला मिळणारा प्रतिसाद आदीवर यावेळी छान चर्चा झाली. कलाकारांना ई सकाळच्या इतर वाचकांनीही प्रश्न विचारले. त्यांच्या प्रश्नांनाही कलाकारांनी उत्तरे दिली. या चर्चेतच गोष्ट तशी गमतीची अर्थात GTG या नाटकाचा दुसरा भाग येणार असल्याची माहीती शशांक याने दिली. मिहीर राजदा या नाटकाचं लेखन करत असून लवकरच ते नाटक मंचावर येईल अशी माहितीही मंगेश कदम यांनी दिली. 

पुणे : नाटकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ई सकाळने नवा उपक्रम सुरू केला, अंक तिसरा. त्याला खूपच चांगला प्रतिसाद नाट्यसृष्टीकडून आणि प्रेक्षकांकडून मिळू लागला आहे. या उपक्रमात या रविवारी उपस्थित होती ती गोष्ट तशी गमतीची या नाटकाची टीम. शशांक केतकर, मंगेश कदम आणि लीना भागवत या कलाकारांनी या चर्चेत सहभाग घेतला. 

यावेळी हे नाटक या कलाकारांकडे कसं आलं.. त्यामागचे किस्से.. शशांक त्यावेळी कसं होणार सून मी ह्या घरची या नाटकाचं शूट करत होता आदी अनेक किस्से लीना यांनी सांगितले. या नाटकाचा अनुभव.. नाटक सुरू असतानाचे किस्से.. प्रेक्षकांचा या नाटकाला मिळणारा प्रतिसाद आदीवर यावेळी छान चर्चा झाली. कलाकारांना ई सकाळच्या इतर वाचकांनीही प्रश्न विचारले. त्यांच्या प्रश्नांनाही कलाकारांनी उत्तरे दिली. या चर्चेतच गोष्ट तशी गमतीची या नाटकाचा दुसरा भाग येणार असल्याची माहीती शशांक याने दिली. मिहीर राजदा या नाटकाचं लेखन करत असून लवकरच ते नाटक मंचावर येईल अशी माहितीही मंगेश कदम यांनी दिली. 

शशांकला लालबागचा राजा अशी पदवी कशी मिळाली आहे.. मंगेश यांनी एेन प्रयोगात सफरचंदाचा कसा भाव केला.. आदी अनेक किस्से या लाईव्ह चॅटमध्ये सांगितले. विशेष म्हणजे, हा शो सूरू असताना अभिनेते मोहन आगाशेही तिथे आपल्या काही खासगी कामानिमित्त आले. या शोची त्यांनीही माहिती घेतली. या उपक्रमाबद्दल या नाटकाच्या टीमने ई सकाळचे व प्रेक्षकांचे आभार मानले. हा चॅट शो जवळपास 50 मिनिटे चालला. 

Web Title: GTG Ank tisara esakal initiative pune