
Youtube: हनुमान चालिसाने केला मोठा विक्रम, 12 वर्षात यूट्यूबवर मिळाले इतके व्ह्यूज
टी-सीरीज ही भारतातील सर्वात मोठी संगीत कंपनी आहे. टी सीरीज नवीन कलाकारांना त्यांच्या कंपनीत काम करण्याची संधी देते. टी सीरीजने नुकताच एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. गुलशन कुमार यांच्या हनुमान चालिसाने यूट्यूबवरचा विक्रम मोडला आहे. संपूर्ण भारतात सर्वाधिक पाहिलेला व्हिडिओ बनला आहे. हा पहिला व्हिडिओ आहे ज्याने 3 अब्ज व्ह्यूजचा टप्पा ओलांडला आहे.
गुलशन कुमार आणि हरिहरन यांनी गायलेली हनुमान चालीसा सर्वाधिक प्ले होणारा व्हिडिओ ठरला आहे. हा व्हिडिओ ललित सेन आणि चंदर यांनी तयार केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 3 अब्ज व्ह्यूज मिळाले आहेत. हा भारतातील पहिला व्हिडिओ आहे. याआधी कोणत्याही व्हिडिओला इतके व्ह्यूज मिळालेले नाहीत.
गुलशन कुमार पिक्चर्सची हनुमान चालिसा 11 वर्षांपूर्वी 10 मे 2011 रोजी यूट्यूबवर रिलीज झाली होती. या व्हिडिओला यूट्यूबवर 3 अब्ज व्ह्यूज मिळाले आहेत. हनुमान चालिसाचा हा व्हिडिओ 9 मिनिटे 41 सेकंदांचा आहे.
गुलशन कुमार यांनी हनुमान चालीसा खूप छान गायली आहे. TSeries चे YouTube वर 58.3 दशलक्ष सब्सक्राइबर्स आहेत. गुलशन कुमार यांची सर्व भजने टी सीरीज वाहिनीवर उपस्थित आहेत.
आजही भजनसम्राट गुलशन कुमार यांची भक्तिगीते ऐकून लोक मंत्रमुग्ध होतात. त्यांची काही भजनं आजही खूप लोकप्रिय आहेत. इंडस्ट्रीत त्यांचे नाव आदराने घेतले जाते. गुलशन कुमार यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर टी सीरीज बनवली आणि यशाच्या शिखरावर नेले. टी सीरीजची ब्रँड व्हॅल्यू कोटींमध्ये आहे.