
Bollywood News : 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये नाव असणारे 'बॉलीवूड सेलिब्रेटी' माहितीये?
Guninees Book of world Records bollywood celebrity : बॉलीवूडमध्ये असे काही सेलिब्रेटी आहेत ज्यांची नावं वेगळ्या कारणासाठी घेतली जातात. त्या सेलिब्रेटींच्या नावावर काही जागतिक विक्रमांची नोंद झाली आहे.
आज आपण अशा सेलिब्रेटींविषयी जाणून घेणार आहोत. त्यांनी केलेले विक्रम हे नेहमीच चर्चेत असतात. अशा बॉलीवूड कलाकारांची नावं ही लिम्का बुक ऑफ गिनिज रेकॉर्डमध्ये घेतले गेले आहे.
सोनाक्षी सिन्हा
बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते शॉटगन या नावानं प्रसिद्ध झालेले शत्रुघ्न सिन्हा यांच्या मुलीनं सोनाक्षीनं कमी वेळेत मोठी लोकप्रियता मिळवली आहे. आता तिचं नाव हे जागतिक विक्रमांच्या पुस्तकात नोंदलं गेलं आहे.
त्याचे एक वेगळे कारण देखील आहे. सोनाक्षीनं एका इव्हेंटमध्ये सोनाक्षीनं एकाच वेळी अनेक महिलांच्या नखांवर सजावट करण्याचे काम केले होते. त्यासाठी २०१६ मध्ये तिच्या नावावर वेगळ्या विक्रमाची नोंदही झाली होती. अमर उजालानं प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार सोनाक्षीच्या या विक्रमानं चाहत्यांनी तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला होता.
Also Read - परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर
ललिता पवार
जेव्हा जेव्हा बॉलीवूडमध्ये महिला खलनायिकांच्या नावाचा उल्लेख केला जातो तेव्हा ललिता पवार यांचे नाव समोर आल्याशिवाय राहत नाही.
ललिता पवार या आतापर्यतच्या सर्वाधिक लोकप्रिय अशा फिमेल व्हिलन होत्या. रामायणातील मंथरेच्या भूमिकांनी त्यांना लोकप्रिय केले होते. बॉलीवूडमध्ये दीर्घकाळ काम करण्याचा आगळा विक्रम करणाऱ्या अभिनेत्री म्हणून त्यांचे नाव घेतले जाते.
आशा भोसले
बॉलीवूडमध्ये सदाबहार आवाज म्हणून ज्यांच्या आवाजाचे कौतूक केले जाते त्या आशाजी भोसले यांच्या गायकीचे लाखो चाहते आहेत. केवळ भारतातच नाहीतर जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये आशाजींचे चाहते आहे.
२०११ मध्ये एकापेक्षा अधिक स्टुडिओजमध्ये रेकॉर्डिंग करणाऱ्या गायिका म्हणून आशाजींचे नाव घेतले जाऊ लागले. याशिवाय वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये अकरा हजारांहून अधिक गाणी गाणाऱ्या गायिका म्हणून आशाजींच्या नावाचा उल्लेख करावा लागेल.
कुमार सानू
९० च्या दशकांत आपल्या बहारदार गायकीनं चाहत्यांची वाहवा मिळवणारे गायक म्हणून कुमार सानू यांचे नाव घ्यावे लागेल. त्यांच्या आवाजातील आशिकीची गाणी चाहत्यांच्या काळजाला भिडली होती.
अजुनही ती गाणी चाहत्यांना प्रिय आहेत. गोष्ट आहे १९९३ ची आहे. त्यादिवशी कुमार सानू यांनी एकाच दिवशी तब्बल २८ गाणी रेकॉर्ड केली होती. अशाप्रकारे त्यांनी एक विश्वविक्रम आपल्या नावावर केला होता.