
Gurmeet Choudhary Talks On Yash Chopra : अभिनेता गुरमीत चौधरीने सांगितले की, दिग्गज चित्रपट निर्माते यश चोप्रा यांच्या सांगण्यावरून चित्रपटापूर्वी टीव्हीवर काम केले होते. टीव्हीवर दीर्घकाळ काम केल्यानंतर गुरमीतने 'खामोशियां' आणि 'वजाह तुम ही हो' सारख्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या.
एका मुलाखतीदरम्यान गुरमीतने सांगितले की, चित्रपट निर्माते यश चोप्रा यांच्या सांगण्यावरून त्याने चित्रपटापूर्वी टीव्हीवर काम करण्यास सुरुवात केली. शाहरुखचे उदाहरण देताना यश चोप्रा म्हणाले की, चित्रपटात येण्यापूर्वी शाहरुखने वागले की दुनिया आणि फौजी सारख्या टेलिव्हिजन शोमध्ये काम केले होते. टीव्हीवर काम केल्यानंतर लवकरच शाहरुखने १९९२ मध्ये 'दीवाना' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
शाहरुखचे दिले उदाहरण
गुरमीत चौधरीने (Gurmeet Choudhary) सांगितले की, मी ३-४ महिने अभिनयाचा कोर्स केला आहे. एके दिवशी मला कुठूनतरी यशजींचा फोन आला, म्हणून मी जास्त विचार न करता थेट लँडलाईनवरून त्यांना फोन केला. कारण त्या काळात मोबाईल खूप महाग होते.
मी यश चोप्रांनी (Yash Chopra) सांगितले की मी एक अभिनेता आहे आणि तुमचा खूप मोठा चाहता आहे. सर मला तुम्हाला एकदा भेटायचे आहे. हे ऐकून चोप्रा म्हणाले, की मुला यशराजच्या ऑफिसमध्ये ये.
मला त्यांचे शब्द अजूनही आठवतात, ते मला म्हणाले की बेटा, तुला चित्रपटात काम करायचे असेल तर आधी टीव्हीवर काम कर, तिथे तुझे नाव कर, एकदा नाव झाले की, कोणताही चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता तुला त्याच्या चित्रपटात भूमिके द्यायला आवडेल. शाहरुख खानला (Shah Rukh Khan) जरा बघ, या चित्रपटापूर्वी त्याने टीव्हीवर काम केले होते. यश चोप्रांचा तो सल्ला ध्यानात ठेवून मी ३-४ वर्षे टीव्हीवर खूप मेहनत केली.
गुरमीतने अनेक प्रसिद्ध टेलिव्हिजन शोमध्ये काम केले. कुमकुम एक प्यारा सा बंधन, गीत हुई सब से पराई, पुनर विवाह हे गुरमीतचे लोकप्रिय शो आहेत. याशिवाय तो झलक दिखला जा, नच बलिए आणि खतरों के खिलाडीमध्ये दिसला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.