Guru Randhawa: 'आम्ही एकत्र सुंदर दिसतोय ना', शहनाजसोबत व्हिडिओ शेअर करत गुरु रंधावाने विचारला हा प्रश्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Guru Randhawa and Shehnaaz Gill

Guru Randhawa: 'आम्ही एकत्र सुंदर दिसतोय ना', शहनाजसोबत व्हिडिओ शेअर करत गुरु रंधावाने विचारला हा प्रश्न

पंजाबी गायक गुरु रंधावा सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून सिंगरने पंजाबी अभिनेत्री शहनाज गिलसोबतच्या त्याच्या केमिस्ट्रीबद्दल प्रश्न विचारले आहेत. तसेच त्यांच्या लेटेस्ट म्युझिक व्हिडीओ 'मून राइज' ला दिलेल्या प्रेमाबद्दल चाहत्यांचे आभार मानले.

गुरूने अलीकडेच पंजाबी अभिनेत्री आणि 'बिग बॉस 13' फेम शहनाज गिलसोबत 'मून राइज' हा त्याचा लेटेस्ट म्युझिक व्हिडिओ शेअर केला आहे. याशिवाय दोन्ही पंजाबी स्टार्सचे फोटोशूट व्हिडिओही व्हायरल झाले होते. दोघेही काही काळ या प्रोजेक्ट्ची जोरदार जाहिरात करत होते. अशा परिस्थितीत दोघांच्या बाँडिंगच्या चर्चा रंगल्या होत्या. आता रंधावानेच चाहत्यांना शहनाजसोबतच्या त्याच्या जोडीबाबत एक मनोरंजक प्रश्न विचारला आहे.

त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना विचारले की, "तो आणि शहनाज दोघेही एकमेकांसोबत क्यूट दिसत आहेत का...? व्हिडिओ शेअर करताना गुरूने कॅप्शन दिले, 'लोक म्हणतात की आम्ही एकत्र गोंडस दिसतो. खरच का? मी आणि शहनाज गिल तुम्हा सर्वांचे आभार मानतो".

हेही वाचा: Phir Aayi Haseen Dillruba: तापसी पन्नूने सुरू केली 'हसीन दिलरुबा'च्या सिक्वेलची शूटिंग, पहिले पोस्टर रिलीज

व्हिडिओमध्ये रंधावा आणि शहनाज मोठ्याने हसताना दिसत आहेत. दोघांनी एकमेकांचा हात धरला असून दोघेही काहीतरी बोलून हसताना दिसत आहेत. शहनाजने पिंक कलरचा बॅकलेस ड्रेस घातला आहे, तर गुरूने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला आहे. गुरूच्या या व्हिडिओवर चाहते खूप प्रेम करत आहेत.

पोस्टवर प्रतिक्रिया देताना, एका चाहत्याने लिहिले, "तुमच्या दोघांमध्ये खूप हॉट केमिस्ट्री आहे." दुसर्‍या चाहत्याने टिप्पणी केली, "हो नक्कीच... शादी करलो आप दो.." एका चाहत्याने लिहिले, सिद्धार्थ शुक्ला नंतर, मला वाटते. तू अशी व्यक्ती आहेस जी शहनाजला प्रेमात ठेवू शकतेस."