'आमिर खानने आश्वासन पूर्ण केलं असतं तर आज माझा भाऊ जिवंत असता'

दिवंगत अभिनेते अनुपम श्याम यांचे भाऊ अनुराग यांचा आमिर खानवर आरोप
aamir khan anupam shyam
aamir khan anupam shyam

आमिर खानसोबत Aamir Khan 'लगान', 'मंगल पांडे' या चित्रपटांमध्ये भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अनुपम श्याम ओझा Anupam Shyam यांचे आजाराने निधन झाले. आमिरने अनुपम यांना आर्थिक सहाय्य करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र नंतर त्याने अनुपम यांचे फोनच उचलले नाहीत, असा आरोप त्यांचा भाऊ अनुराग यांनी केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनुराग यांनी आमिर खानवर काही आरोप केले आहेत. आमिरने दिलेलं आश्वासन पूर्ण केलं असतं तर आज माझा भाऊ जिवंत असता, असंही ते म्हणाले.

"आमिरने जेव्हा माझ्या भावाच्या मेसेज आणि फोन कॉल्सना उत्तर देणं बंद केलं, तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं होतं. आमिरने जर त्याचं आश्वासन पूर्ण केलं असतं तर आज माझा भाऊ जिवंत असता. ही जी मोठी लोकं आहेत, जे स्वत:ला खूप मोठा ब्रँड समजतात, ते त्यांच्या जवळच्या लोकांना का मदत करू शकत नाहीत? या जगात तुम्ही काय घेऊन आलात आणि काय घेऊन जाणार आहात? सरकारकडे मदतीची भीक मागणाऱ्या या लोकांची ते मदत का नाही करू शकत? असंख्य अभिनेते, कोरिओग्राफर्स आणि इतर तंत्रज्ञ हे मदतीची वाट पाहत आहेत आणि इंडस्ट्रीतील मोठी लोकं फक्त बसून आहेत", अशा शब्दांत अनुराग यांनी टीका केली.

aamir khan anupam shyam
'माझ्यावरील सेट चोरीचा आरोप बिनबुडाचा'; श्रेयस तळपदेने मांडली आपली बाजू

डायलिसिस सेंटरचं दिलं होतं आश्वासन

'आजतक'ला दिलेल्या मुलाखतीत अनुराग म्हणाले होते, "माझ्या कुटुंबीयांनी अनेक संकटांचा सामना केला. गेल्या महिन्यातच माझ्या आईचे निधन झाले. आई प्रतापगडमध्ये आजारी होती आणि त्यावेळी आईला भेटायला जाऊ शकत नसल्याची चिंता अनुपम यांना सतावत होती. डायलिसिस सेंटर नसताना प्रतापगडला जाणं म्हणजे अनुपमने स्वत:चं आरोग्य धोक्यात घालण्यासारखं होतं. प्रतापगडमध्ये डायलिसिस सेंटर व्हावं यासाठी ते आमिर खानकडे गेले होते. आमिर खानने आम्हाला आश्वासन दिलं होतं. पण नंतर त्याने आमचे फोन कॉल्स उचलणं बंद केलं."

अनुपम श्याम यांनी दस्तक, हजार चौरासी की मां, दुश्मन, सत्या, दिल से, जख्म, संघर्ष यांसारख्या अनेक चित्रपटांबरोबरच टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. बालिका वधू, प्रतिज्ञा या त्यांच्या गाजलेल्या मालिका आहेत. मन या लोकप्रिय मालिकेला त्यांनी दिलेला आवाज आणि प्रतीज्ञा या मालिकेतील ठाकूर सज्जन सिंह या भूमिकेमुळे त्यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली. ते मूळचे उत्तर प्रदेशातील प्रतापगडचे राहणारे. तेथेच त्यांनी अॅक्टिंगचे धडे गिरविले आणि अभिनयाची प्रचंड आवड म्हणून मुंबईचा रस्ता धरला. येथे आल्यानंतर हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये त्यांनी काम केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com