'निदान आमच्या वयाचे रोल तरी आम्हाला करायला द्या' - नीना गुप्ता

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

'सांड की ऑँख'​ या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी पसंती दिली आहे.मात्र ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी वयाचा मुद्दा उचलत चित्रपटाच्या भूमिकेवर टिप्पणी केली आहे. 

मुंबई : तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर यांचा आगामी चित्रपट 'सांड की ऑँख' चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. शुटर दादींवर आधारीत असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. आता मात्र या चित्रपटाच्या भूमिकेवरुन वादाला नवे तोंड फुटले आहे. ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी वयाचा मुद्दा उचलत चित्रपटाच्या भूमिकेवर टिप्पणी केली आहे. 

'सांड की ऑँख' चित्रपटामध्ये तापसी आणि भूमी वृद्ध महिलांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. वृद्ध शार्पशूटर चंद्रो तोमर आणि प्रकाशी तोमर यांच्यावर आधारीत हा चित्रपट आहे. त्यावर नीना गुप्ता यांनी ट्विटरच्या माध्यमातून टिप्पणी केली आहे.

एका ट्विटर युजरने चित्रपटाचा ट्रेलर पाहून ट्विट करताना लिहिलं, 'मला भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नू या दोघी आवडल्या आहेत. पण, या भूमिका नीना गुप्ता, शबाना आझमी किंवा जया बच्चन यांना दिल्या असत्या तर बरं झालं असतं.' 

या ट्विटला रिप्लाय करताना नीना गुप्ता यांनी लिहिलं,' मी देखील तोच विचार करत होते, निदान आमच्या वयाच्या भूमिका तरी आमच्याकडून करुन घ्या.' 

नीना यांच्या ट्विटला कंगणा रणावतची बहिण रंगोली चंडेल हीने एक ट्विट केलं ज्यामध्ये ती म्हणाली,' नीना जी खरं तर या रोलची ऑफर कंगणाला आली होती मात्र तीने ही ऑफर नाकारली. वयस्कर महिलांच्या भूमिकेसाठी या चित्रपटामध्ये त्यात वयाच्या अभिनेत्रींनी काम करावं असं तिचं मत होतं. त्यासाठी रम्या कृष्णन आणि नीना गुप्ता या नावांना तिची पसंती होती.' 

 

बॉलिवूडमध्ये याआधी नेपोटिझमच्या मुद्द्यावरुन अनेक वाद झाले. आता 'Agesim' चा मुद्दा वादाचं कारण ठरत आहे. वयस्कर महिलांच्या भूमिकेत तापसी आणि भूमी दिसत आहेत. बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आहेत ज्या अशा भूमिकांसाठी योग्य आहेत आणि तरी तरुण अभिनेत्रींना अशा रोलसाठी घेतलं जात असल्याचं मत नेटकऱ्यांकडून व्यक्त केलं जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hamari umar ke role toh humse kara lo Neena Gupta